Republic Day 2023: प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहणार 'या' मुस्लिम देशाचे राष्ट्राध्यक्ष

Republic Day 2023 Chief Guest: भारत सरकारने 2023 च्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल-सिसी यांना निमंत्रण पत्र पाठवले आहे.
Egypt's President Abdel Fattah El-Sisi
Egypt's President Abdel Fattah El-SisiDainik Gomantak

India invites Egypt's President Abdel Fattah El-Sisi: भारत सरकारने 2023 च्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल-सिसी यांना निमंत्रण पत्र पाठवले आहे. 2014 पासून इजिप्तच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळणाऱ्या एल सिसी यांना पाठवलेल्या या निमंत्रणकडे भारताचा आफ्रिका आणि अरब जगतामध्ये समान प्रवेश म्हणून पाहिले जात आहे.

भारत-इजिप्त संबंध अधिक दृढ होत आहेत

या वर्षी दोन्ही देशांनी राजनैतिक संबंधांचा 75 वा वर्धापन दिन साजरा केला. त्याचवेळी भारत इजिप्तसोबतचे (Egypt) राजकीय आणि लष्करी संबंध सातत्याने वाढवत आहे. या गोष्टी लक्षात घेऊन नवी दिल्लीने 2023 च्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल-सिसी यांना निमंत्रण पत्र पाठवले आहे.

Egypt's President Abdel Fattah El-Sisi
Republic Day 2022: PM मोदींनी ख्रिस गेलला लिहलं पत्र, 'युनिव्हर्स बॉस' नं दिलं हे उत्तर

इजिप्तचे महत्त्व

इजिप्त हा अरब जगतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. यासोबतच इजिप्त ही आफ्रिकेतील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. अशा परिस्थितीत राष्ट्राध्यक्ष अल सिसी यांच्यासाठी रेड कार्पेट अंथरणे हे सूचित करते की, येत्या काही वर्षांत दिल्ली-कैरो संबंधांवर विशेष लक्ष दिले जाईल. काही काळापूर्वी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी इजिप्तच्या दौऱ्यात राष्ट्राध्यक्ष एल-सिसी यांची भेट घेतली होती. दरम्यान, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचा खास संदेशही त्यांना दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com