Seema Haider-Sachin Love Story Dainik Gomantak
देश

Seema Haider Love Story: सीमा हैदरच्या लव्हस्टोरीचा The End, पाकिस्तानला परत पाठवण्यात येणार?

Seema Haider Love Story: देशात मागील काही दिवसांपासून पाकिस्तानी महिला सीमा हैदरची प्रेमकहाणी चर्चेचा केंद्रबिंदू आहे.

Manish Jadhav

Seema Haider Love Story: देशात मागील काही दिवसांपासून पाकिस्तानी महिला सीमा हैदरची प्रेमकहाणी चर्चेचा केंद्रबिंदू आहे. यातच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. सीमा हैदरला तिच्या मायदेशात (पाकिस्तान) परत पाठवण्यात येणार आहे.

त्यासंबंधीची कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे. उत्तर प्रदेशचे विशेष एडीजी (लॉ एण्ड ऑर्डर) प्रशांत कुमार यांनी ही माहिती दिली आहे. सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे त्यांनी बुधवारी सांगितले.

भारतीय तरुण सचिन मीनाच्या प्रेमात पडल्यानंतर सीमा हैदर उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे राहत आहे. यूपी एटीएस त्यांची चौकशी करत असून याप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. सीमा हैदर पाकिस्तानी गुप्तहेर असल्याचा आरोप केला जात आहे.

प्रशांत कुमार यांनी सांगितले की, आमची कोणतीही टीम नेपाळला (Nepal) चौकशीसाठी जाणार नाही. सीमा हैदरची चौकशी सुरु आहे. सर्व एजन्सी आपापले काम करत आहेत. ही बाब दोन देशांशी संबंधित आहे. पुरावे मिळेपर्यंत काहीही बोलणे योग्य नाही.

सीमाबाबत नवा खुलासा

यापूर्वी, सीमा हैदरबाबत तपास यंत्रणांना अनेक महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. सीमाला भारतात येण्यासाठी तिसऱ्या व्यक्तीने मदत केली आहे. सीमाला भारतीय पेहराव करुन प्रवेश दिला.

गुप्तचर संस्थेशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशी भीती व्यक्त केली जात आहे की, सीमाने तिचा ड्रेस अप अशा प्रकारे केला होता की ती ग्रामीण भारतीय महिलेसारखी दिसेल.

सुरक्षा यंत्रणांच्या नजरेपासून वाचण्यासाठी तिने आपल्या मुलांचाही असाच पेहराव केला होता. तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, हीच पद्धत मानवी तस्करीमध्ये गुंतलेल्या महिलांनी वापरली आहे. याशिवाय सीमा ज्या भाषेत अस्खलितपणे बोलत आहे,

अशा प्रकारचे प्रशिक्षण नेपाळमध्ये उपस्थित असलेल्या पाकिस्तानी हस्तकांकडून त्या महिलांना दिले जाते, ज्यांना नेपाळ सीमा ओलांडून अवैध कृत्ये करण्यासाठी भारतात (India) पाठवले जाते. आता भारतीय गुप्तचर आणि तपास यंत्रणांच्या अखत्यारीत असे एजंट आहेत जे अशा गोष्टींसाठी विशेष तयारी करतात.

वास्तविक, अद्यापही हे कोडे उलघडले नाही की, सीमाला पाकिस्तानात राहून नेपाळच्या कोणत्या ठिकाणाहून भारतात प्रवेश करणे शक्य आहे हे कसे कळले.

अशा परिस्थितीत तपास यंत्रणांनी आतापर्यंत केलेल्या तपासानुसार सीमाला कोणत्यातरी तिसऱ्या व्यक्तीने मदत केली असावी. त्यामुळेच आता अशा गोष्टींसाठी विशेष तयारी करणारे एजंट तपास यंत्रणांच्या रडारावर आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एटीएसने सीमाच्या चौकशीदरम्यान वापरलेल्या कोडवर्ड्सची चौकशी केली. सीमाने अनेकदा संभाषणात मेसेजिंग-चॅटिंगदरम्यान असे कोडवर्ड वापरल्याचा एटीएसचा संशय आहे. हा खुलासा अतिशय खळबळजनक आहे, कारण असे कोडवर्ड आयएसआय आणि दहशतवाद्यांनी वापरले आहेत.

दुसरीकडे, याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे की सीमा जर पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेची प्यादी असेल, तर ती भारताविरुद्ध काही मोठ्या कटात सहभागी होऊ शकते. सध्या यूपी एटीएससोबतच आणखी एक तपास यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहे.

यासोबतच सीमाला शुद्ध हिंदी बोलायला कोणी शिकवलं यावरही लक्ष केंद्रित केलं जात आहे. तिला हिंदू कर्मकांड कसे कळले. नोएडा गाठण्यासाठी तिला कोणी मदत केली? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणे अजून बाकी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांनी गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT