ceasefire violation news Dainik Gomantak
देश

Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानकडून काही तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन? श्रीनगरमध्ये ड्रोन दिसल्याचा दावा, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट

Srinagar drone sighting: जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरसह अनेक ठिकाणी तसेच पंजाब आणि राजस्थानच्या काही भागांमध्ये पुन्हा फायरिंग आणि ड्रोन हल्ला केल्याचा दावा केला जातोय

Akshata Chhatre

श्रीनगर: भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी करारावर सहमती झाल्यानंतर काही तासांतच पाकिस्तानने शनिवारी (दि.10) रोजी आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेचे उल्लंघन करत जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरसह अनेक ठिकाणी तसेच पंजाब आणि राजस्थानच्या काही भागांमध्ये पुन्हा फायरिंग आणि ड्रोन हल्ला केल्याचा दावा केला जातोय.

पाकिस्तानने शस्त्रसंधीची सुरुवात केल्यानंतर भारताने दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी करार झाल्याची घोषणा केली होती. त्यानंतर काही तासांतच पाकिस्तानकडून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर येतेय.

जम्मूमध्ये पुन्हा स्फोटांचे आवाज

सूत्रांनी केलेल्या दाव्यानुसार श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आल्याने परिसरात रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. तसेच, संपूर्ण शहरात ब्लॅकआऊट करण्याचे आदेश देण्यात आलेत. राजस्थानमधील पोखरण आणि काश्मीरमधील बारामुल्ला येथे प्रत्येकी एक ड्रोन पाडण्यात आलेत.

पाकिस्तान लष्कराने अखनूर, राजौरी आणि आरएस पुरा सेक्टरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर तोफगोळ्यांचा मारा केला असून जम्मूच्या पलानवाला सेक्टरमधील नियंत्रण रेषेवरही शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटनांची नोंद झाली आहे.

बारामुल्लामध्ये एक ड्रोन पाडण्यात आले असून संशयास्पद मानवरहित हवाई वाहने दिसली आहेत. बारामुल्ला आणि श्रीनगर दोन्ही ठिकाणी ब्लॅकआऊट लागू करण्यात आलाय. राजौरीमध्येही ड्रोन दिसले असून जम्मूतील सांबा जिल्ह्यात हवाई हल्ल्याचे सायरन ऐकू आल्याची माहिती समोर येतेय.

पंजाब, राजस्थानमध्येही ब्लॅकआऊट

पंजाबमध्ये गुरुदासपूर, फिरोजपूर, पठाणकोट, होशियारपूर, जालंधर आणि फरीदकोट येथे ड्रोनची हालचाल दिसून आली. जालंधर आणि लुधियाना प्रशासनाने रहिवाशांना सतर्क राहण्याचे आणि परिस्थिती लक्षात घेता ब्लॅकआऊट करण्याचे निर्देश दिले गेल्याचा दावा केला जातोय.

जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांनी शस्त्रविरामानंतर काही तासांतच झालेल्या या हल्ल्याबद्दल तीव्र निषेध व्यक्त केला होता. हा काही संघर्ष विराम नसल्याचं म्हणत त्यांनी श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत असल्याची माहिती दिली होती.

'ना'पाक हल्ला सुरूच

काही तासांपूर्वीच सरकारने भारत आणि पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी सहमत झाल्याने २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील सुरू असलेले लष्करी ऑपरेशन थांबणार असल्याची घोषणा केली होती. पाकिस्तानने चर्चेची सुरुवात केल्यानंतर शनिवारी दुपारी दोन्ही देशांच्या लष्करी ऑपरेशन्सच्या महासंचालकांच्या स्तरावर झालेल्या चर्चेदरम्यान शस्त्रसंधी करारावर सहमती झाली होती. मात्र, पाकिस्तानच्या या कृतीमुळे शस्त्रसंधीचे प्रयत्न पूर्णपणे निष्फळ ठरले आहेत आणि सीमावर्ती भागातील तणाव पुन्हा वाढला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT