India Pakistan War:भारत-पाक युद्ध झाल्यास महागाईचा भडका उडण्याची शक्यता; कोणाला बसणार मोठा फटका?

Economic Impact of War: ही स्थिति युद्धात परिवर्तीत झाली तर त्याचे थेट परिणाम भारताला भोगावे लागणार आहेत; आपल्यावर या युद्धाचा काय परिणाम होऊ शकतो, कोणत्या गोष्टी महाग होतील?
 war and inflation India
war and inflation IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

India Economy Crisis: सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तणावाची स्थिति निर्माण झाली आहे. पाकिस्तानकडून येणाऱ्या प्रत्येक हल्ल्याला भारत चोख प्रत्युत्तर देतोय, मात्र जर का ही स्थिति युद्धात परिवर्तीत झाली तर त्याचे थेट परिणाम भारताला भोगावे लागणार आहेत. आपल्यावर या युद्धाचा काय परिणाम होऊ शकतो, कोणत्या गोष्टी महाग होतील हे जाणून घेऊया.

भारत हा प्रामुख्याने कृषि प्रधान देश आहे. भारतातील उत्तरेकडील राज्ये जसे की पंजाब, राजस्थान, जम्मू-कश्मीर आणि हरियाणा ही अन्न उत्पादक राज्ये आहेत. युद्धजन्य स्थितीचा शेतीवर परिणाम होऊ शकतो. बियाणी, पाणीपुरवठा, मजुरांची उपलब्धता यांच्यावर झालेल्या परिणामामुळे अन्न पदार्थ महाग होऊ शकतात. गहू, तांदूळ, डाळी, साखर यांच्या किंमती वाढण्याची शक्यता असते.

युद्धाच्या काळात रेल्वे वाहतूक किंवा महामार्ग बंद असतात, परिणामी फळ-भाज्यांचा पुरवठा वेळेत होत नाही. बाजारात पुरवठा कमी आणि मागणी अधिक असल्याने कांदा, बटाटा,टोमॅटो यांच्या किंमती म्हणूनच युद्धाच्या काळात वाढण्याची शक्यता असते.

 war and inflation India
S400 Defence System: एस-४०० प्रणालीचे नुकसान झाल्याच्या बातम्या खोट्या; पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांना प्रत्युत्तर देणारे कवच सुरक्षित

एकंदरीतच युद्धाच्या काळात वस्तूंचे उत्पादन, वाहतूक आणि वितरण साखळीवर परिणाम होण्याची शक्यता असते आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढतात.

युद्धजन्य काळात इंधन महाग झाल्यास त्याचा वेगळाच फटका बसण्याची शक्यता असते. सिंचन, वाहतुक आणि यंत्रसामग्री चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात इंधनाची गरज असते आणि युद्ध सुरू असताना किंमत वाढल्यास उत्पादनाच्या खर्चाच्या तुलनेत नफा घटतो आणि आर्थिक नुकसनीचा फटका बसण्याची शक्यता असते.

युद्धाच्या परिस्थितीत सीमेवरील किंवा देशातील इतर भागातील रोजगार, बाजारपेठ, आणि शेतीवर आधारित छोट्या उद्योगांवरही परिणाम होतो. सरकारकडून युद्धाच्या काळात सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही यांची दक्षता घेतली जाते, मात्र तरीही भरपूर निधी युद्धावर खर्च होत असल्याने अनुदान, विमा योजना किंवा इतर आर्थिक पाठपुरवठा काही काळासाठी स्थगित होण्याची शक्यता असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com