Food Poisoning Dainik Gomantak
देश

Odisha Food Poisoning: दहीवडा खाणं पडलं महागात, 27 बालकांसह 58 जणांना विषबाधा; ओडिशात खळबळ

Jajpur Dahibada Poisoning Case: ओडिशातील जाजपूर जिल्ह्यात दहीवडा खाल्ल्यामुळे 58 जणांची प्रकृती खालावल्याची धक्कादायक घटना समोर आली.

Sameer Amunekar

Jajpur Dahibada Poisoning Case: ओडिशातील जाजपूर जिल्ह्यात दहीवडा खाल्ल्यामुळे 58 जणांची प्रकृती खालावल्याची धक्कादायक घटना समोर आली. दशरथपुर ब्लॉक अंतर्गत येणाऱ्या पातापूर गावात शुक्रवारी एका स्थानिक विक्रेत्याकडून दहीवडा खाल्ल्यानंतर अनेकांना उलट्या आणि तापाचा त्रास सुरु झाला. या 58 बाधितांमध्ये 27 बालकांचा समावेश असून सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितांना दशरथपूर सामुदायिक आरोग्य केंद्र आणि जाजपूर जिल्हा मुख्यालय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले होते. जाजपूरचे जिल्हाधिकारी अंबर कुमार यांनी सांगितले की, उपचारानंतर 21 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले.

दुसरीकडे, या घटनेची माहिती मिळताच राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मुकेश महालिंग यांनी रुग्णालयात जाऊन बाधितांची विचारपूस केली. माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, प्राथमिक अहवालानुसार ही घटना दहीवड्याच्या सेवनामुळे झाली असावी. अन्नाचे आणि पाण्याचे नमुने संकलित करुन ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी राज्य सरकारने तीन विशेष पथकांचे गठन केले असल्याचेही मंत्र्यांनी नमूद केले. वाढत्या उष्णतेमुळे बाहेरचे खाद्यपदार्थ खाताना नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

भाजप खासदार रबींद्र नारायण बेहरा यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, बाधितांमध्ये 27 मुलांचा समावेश असून सर्वांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे आणि त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. दरम्यान, या गावात एका 70 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला, मात्र त्या उपचारासाठी रुग्णालयात (Hospital) आल्या नव्हत्या. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच दहीवड्याशी त्याचा संबंध आहे की नाही, हे समजू शकेल असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या सर्व रुग्णांवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT