Odisha Health Minister Naba Das Dainik Gomantak
देश

Naba Das Death: ओडिशाच्या आरोग्यमंत्र्यांचा मृत्यू; पोलिस कर्मचाऱ्याच्या गोळीबारात झाले होते गंभीर जखमी

भुवनेश्वरमध्ये रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू

Akshay Nirmale

Naba Das Death: ओडिशाचे आरोग्य मंत्री नबा किशोर दास यांच्यावर आज, रविवारी दुपारी जीवघेणा हल्ला झाला होता. एका कार्यक्रमाला गेलेले असताना गाडीतून उतरल्यावर त्यांच्यावर एका पोलीस कर्मचाऱ्याने गोळीबार केला होता.

दास यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना भुवनेश्वरला हलविण्यात आले होते, पण उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

मुख्यमंत्री नवीन पटनायक म्हणाले, "मंत्री नबा दास यांच्या अत्यंत दुर्दैवी निधनाने मला धक्का बसला आहे. त्याचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शक्य ते सर्व प्रयत्न केले. नबा दास सरकार आणि पक्षासाठी एक संपत्ती होते.

लोकांच्या हितासाठी त्यांनी आरोग्य विभागात अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवले. एक नेता म्हणून नबा दास यांनी बिजू जनता दलाला मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

ओडिशातील झारसुगुडा जिल्ह्यातील बृजराजनगरजवळ हा हल्ला झाला. येथील गांधी चौकाजवळ पोलिस कर्मचाऱ्याने दास यांच्यावर गोळ्या झाडल्या.

दास यांच्यावर गोळीबार करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव गोपाल दास असे असून तो गांधी चौकात ASI म्हणून तैनात होता. गोपाल याने रिव्हॉल्व्हरमधून दास यांच्यावर 4 ते 5 राउंड फायर केले. गोपाल याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.

नबा किशोर दास हे बिजू जनता दलाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते ओडिशातील झारसुखडा जिल्ह्यातील महत्वाचे नेते आहेत. ते आधी काँग्रेसमध्ये होते, नंतर त्यांनी बिजू जनता दलात प्रवेश केला. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या सरकारमध्ये ते आरोग्य मंत्री होते.

महाराष्ट्रातील शनि शिंगणापूर येथील मंदिराला एक कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा सोन्याचा कलश त्यांनी दान दिला होता. हा कलश 1.7 किलो सोन्याचा आहे. शिवाय 5 किलो चांदीचा कलशही त्यांनी दान दिला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Bollywood: रामायणाची 'स्टार कास्ट' उघड! रणबीर कपूर, साई पल्लवी सोबत 'हे' कलाकार साकारणार महत्वाच्या भूमिका

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT