Sweden Girl Marriage: स्वीडनच्या मुलीची वरात थेट उत्तरप्रदेशच्या गावात! फेसबूकवरून जुळले प्रेम...

2012 मध्ये फेसबुकवर झाली होती ओळख, घरच्यांचाही लग्नाला पाठिंबा
Sweden Girl Marriage
Sweden Girl MarriageDainik Gomantak

Sweden Girl Marriage: प्रेमात पडलेले लोक प्रेमासाठी वाट्टेल ते करायला तयार होत असतात. अनेकदा प्रेमी कोणत्याही टोकाला जातात. त्याचे प्रत्यय आजूबाजूच्या घटनांवर नियमित येत असतात.

आताही असेच एक उदाहरण समोर आले आहे. यामध्ये स्वीडनमधील तरूणीने चक्क हजारो किलोमीटरचा प्रवास करून भारतात येऊन उत्तर प्रदेशातील मुलाशी लग्न केले आहे.

Sweden Girl Marriage
Odisha Minister Naba Das: ओडिशाच्या आरोग्य मंत्र्यांवर प्राणघातक हल्ला; पोलिस कर्मचाऱ्याने घातल्या गोळ्या

क्रिस्टन लीबर्ट (Christen Liebert) असे या मुलीचे नाव आहे. ती मूळची स्वीडनची आहे. उत्तर प्रदेशातील पवन कुमार याच्याशी तिची फेसबुकवरून 2012 मध्ये ओळख झाली होती. पवनकुमार हा उत्तर प्रदेशातील एटा या गावचा आहे.

त्याने बी.टेक.चे शिक्षण घेतले असून तो देहराडूनमध्ये एका खासगी फर्ममध्ये कार्यरत आहे. क्रिस्टन लीबर्ट शुक्रवारी (२७ जानेवारी) एटा येथे आली. येथील शाळेत दोघांचे हिंदू प्रथापरंपरांनुसार लग्न पार पडले.

या दोघांच्या विवाह सोहळ्याच्या व्हिडिओमध्ये भारतीय विवाह परंपरेनुसार वेशभूषा केलेले क्रिस्टन लिबर्ट आणि पवनकुमार एकमेकांना पुष्पहार घालताना दिसतात. या दोघांची 2012 मध्ये फेसबुकवर ओळख झाली होती.

त्यानंतर दोघांमध्ये चॅटिंग सुरू झाले आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. जवळपास 11 वर्षे ते एकमेकांना डेट करत आहेत.

Sweden Girl Marriage
Mughal Garden Renamed: असा आहे मुघल गार्डनचा इतिहास! इंग्रजांनी 106 वर्षांपूर्वी दिले होते नाव...

पवन कुमारच्या कुटुंबीयांचा या लग्नाला कोणताही आक्षेप नाही. त्याचे वडील गीतम सिंह म्हणाले की, मुलांच्या आनंदातच आमचा आनंद आहे. आमचा या लग्नाला पाठिंबा आहे.

क्रिस्टन लिबर्ट म्हणाली की, मी यापूर्वीही भारतात आली होते. मला भारत खूप आवडतो. या लग्नामुळे मी खूप खूश आहे.

पाकिस्तानी महिला लग्नासाठी आली होती

दरम्यान, एका आठवड्यापूर्वीच एक पाकिस्तानी महिला गेमिंग अॅप लुडोवर भेटलेल्या पुरुषाशी लग्न करण्यासाठी बेकायदेशीररित्या भारतात आली होती. पण तिला अटक करण्यात आली होती. मुलायमसिंह यादव नावाच्या तरूणाला भेटण्यासाठी ही तरुणी पाकिस्तानातातून कर्नाटकात आली होती. कर्नाटक पोलिसांनी तिच्याकडे वैध कागदपत्रे नसल्याचे सांगितले होते. ही मुलगी नेपाळ सीमेवरून भारतात दाखल झाली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com