Ramcharitmanas Row: लखनौमध्ये रामचरितमानसच्या प्रती जाळल्या... व्हिडिओ व्हायरल

रामचरितमानस मधील मजकुरावरून वाद वाढला
Ramcharitmanas Row
Ramcharitmanas RowDainik Gomantak
Published on
Updated on

Ramcharitmanas Row: गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशात संत तुलसीदास यांनी लिहिलेल्या रामचरितमानस या पुस्तकावरून वाद निर्माण झाला असून हा वाद थांबण्याचे नाव घेईना. उलट आता पुस्तकातील ओळी ओबीसींचा अपमान करणाऱ्या असल्याचे सांगत उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे या पुस्तकाचे दहन करण्यात आले आहे.

Ramcharitmanas Row
Sweden Girl Marriage: स्वीडनच्या मुलीची वरात थेट उत्तरप्रदेशच्या गावात! फेसबूकवरून जुळले प्रेम...

आधी बिहारचे मंत्री चंद्रशेखर यांनी याबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर कर्नाटकातील एका निवृत्त प्राध्यापकाने रामचरितमानसवर वादग्रस्त विधान केले. यानंतर समाजवादी पक्षाचे आमदार स्वामी प्रसाद मौर्य यांनी रामचरितमानसविषय़ी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

दरम्यान, भाजपसह अनेक पक्षांनी स्वामी प्रसाद मौर्य यांच्या विधानाला विरोध केला आहे. दुसरीकडे, सपाचे काही नेतेही त्यांच्या वक्तव्याचा विरोध करत आहेत. दरम्यान, लखनौमधून काही छायाचित्रे समोर आली आहेत.

ज्यामध्ये एक स्वामी प्रसाद मौर्य यांच्या समर्थनाने लोक रस्त्यावर उतरलेले दिसले. हे प्रकरण इथेच संपले नाही तर त्यांनी रामचरितमानसच्या प्रतीही रस्त्यावरच जाळल्या आहेत. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

Ramcharitmanas Row
Drugs Seized: ट्रकमधून 1589 किलो गांजा नेणाऱ्या पिता-पुत्राला अटक; किंमत अंदाजे 3.5 कोटींवर

रविवारी लखनौमध्ये अखिल भारतीय ओबीसी महासभा ही संघटना स्वामी प्रसाद मौर्य यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरली. यावेळी लोकांनी लखनौ येथील वृंदावन योजनेत लोकांनी पुस्तकाच्या प्रती जाळल्या. रामचरितमानसच्या वादग्रस्त भागाच्या प्रती जाळून महासभेतर्फे निषेध करण्यात आला.

महासभेच्या लोकांचे म्हणणे आहे की, आम्हाला रामचरितमानसमधून महिला शक्ती, शूद्र, दलित समाज आणि ओबीसी समाजाच्या विरोधातील आक्षेपार्ह मजकूर काढून टाकायचा आहे. तो काढल्यावर आमचा विरोध थांबेल.

अन्यथा ठिकठिकाणी आंदोलने होतील. जग चंद्रावर जात असताना भारतातील तथाकथित 15 टक्के समाज 85 टक्के समाजाला मूर्ख बनवून त्यांना मागे नेण्याचा प्रयत्न करत होता, असेही त्यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com