Odisha bus crashes into auto killing six family members Dainik Gomantak
देश

Odisha Accident: ओडिशात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात, भरधाव बसची ऑटोला जोरदार धडक; एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, 4 जखमी

Odisha Ganjam Road Accident: ओडिशातील गंजाम जिल्ह्यातून एक अत्यंत थरारक आणि मनाला चटका लावणारी अपघाताची घटना समोर आली.

Manish Jadhav

Odisha Ganjam Road Accident: ओडिशातील गंजाम जिल्ह्यातून एक अत्यंत थरारक आणि मनाला चटका लावणारी अपघाताची घटना समोर आली. पुरुषोत्तमपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लाडकापल्ली चौकाजवळ एका भरधाव खासगी बसने ऑटो-रिक्षाला दिलेल्या भीषण धडकेत एकाच कुटुंबातील 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भयानक होता की, धडक दिल्यानंतरही बस थांबली नाही; ती ऑटोला सुमारे 100 मीटरपर्यंत रस्त्यावरुन फरफटत घेऊन गेली. या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अपघातानंतर घटनास्थळी एकच आरडाओरडा आणि रक्ताचा सडा पाहायला मिळाला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली.

मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्दैवी ऑटो-रिक्षात एकाच कुटुंबातील 10 जण स्वार होते. हे सर्वजण माँ सिंहासिनी देवीच्या दर्शनासाठी मंदिराकडे जात होते. भक्तीच्या उत्साहात प्रवास सुरु असतानाच लाडकापल्ली चौकाजवळ काळाने त्यांच्यावर झडप घातली. प्रत्यक्षदर्शनी दिलेल्या माहितीनुसार, समोरुन येणारी बस अत्यंत वेगात होती. अचानक बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ती थेट ऑटो-रिक्षावर जाऊन आदळली. या भीषण धडकेत ऑटोचा अक्षरशः चक्काचूर झाला.

अपघाताची (Accident) भीषणता एवढी मोठी होती की, या दुर्घटनेत 6 भाविकांना आपले प्राण गमवावे लागले असून अद्याप मृत व्यक्तींची नावे अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाहीत. अपघात घडवल्यानंतर आरोपी बस चालक वाहनासह घटनास्थळावरुन फरार झाला.

अपघाताचा आवाज ऐकताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरु केले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि रुग्णवाहिका पथक घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने कोदला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने अधिक उपचारासाठी त्यांना ब्रह्मपूर येथील एमकेसीजी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात हलवण्यात आले.

जखमींपैकी काहींची प्रकृती अद्यापही अत्यंत नाजूक आहे. पुरुषोत्तमपुर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला असून, फरार बस चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांची (Police) पथके रवाना करण्यात आली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Maharashtra FDA Action: तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडला दणका! गुटख्याची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर होणार कारवाई; एफडीए ॲक्शन मोडवर

Himachal Pradesh Landslide: हिमाचलमध्ये भीषण अपघात! चालत्या सुमोवर कोसळली दरड; 13 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू

Israel Crime: इस्त्रायलमध्ये भारतीय नागरिकाची निर्घृण हत्या, रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह; 31 वर्षीय संशयिताला अटक

Mangal Gochar 2026: नोकरीत प्रमोशन अन् धनलाभाचे सुवर्ण योग! मृगशिरा नक्षत्रात मंगळाचे बली गोचर! ''या' राशींचे नशीब चमकणार

'CJP Protest' निर्णायक टप्प्यात! मोदी सरकारकडून तीनपैकी दोन मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर शनिवारी निर्णय

SCROLL FOR NEXT