Odisha Crime: ओडिशात माणुसकीला काळीमा फासणारी घटना! जिल्हा रुग्णालयातून अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन सामूहिक बलात्कार; एका महिलेसह तिघे अटकेत

Odisha Minor Girl Kidnapping Crime: ओडिशातील झारसुगुडा जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली.
gang rape case involving minor girl in Odisha
gang rape case involving minor girl in OdishaDainik Gomantak
Published on
Updated on

Odisha Minor Girl Kidnapping Crime: ओडिशातील झारसुगुडा जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली. येथील जिल्हा मुख्यालय रुग्णालयाच्या आवारातून एका अल्पवयीन मुलीचे कथितरीत्या अपहरण करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून महिला आणि बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. रुग्णालय प्रशासनाचा बेजबाबदारपणा आणि सुरक्षेच्या अभावामुळे इतक्या संवेदनशील ठिकाणी नराधमांनी हे कृत्य धाडसाने केल्याचे बोलले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी रुग्णालयात दाखल असलेल्या आपल्या एका जवळच्या नातेवाईकाची काळजी घेण्यासाठी तिथे थांबली होती. ती रुग्णालयाच्या आवारात केअरटेकर म्हणून उपस्थित असताना आरोपींनी तिला फूस लावून रुग्णालयाच्या आवाराबाहेर नेले. त्यानंतर तिला जवळच्याच एका जंगलात नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून झारसुगुडा विमानतळ पोलीस ठाण्याने तात्काळ तपास सुरु केला. पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करुन तांत्रिक पुराव्यांच्या आधारे वेगाने कारवाई करत एका महिलेसह तिघांना बेड्या ठोकल्या. या गुन्ह्यात मदत केल्याच्या आरोपाखाली एका महिलेलाही सहआरोपी करण्यात आले.

gang rape case involving minor girl in Odisha
Bihar Crime: चेटकीण असल्याचा संशय, 250 लोकांनी घेरुन एकाच घरातील 5 जणांना ठार केले, पेट्रोल टाकून मृतदेह जाळले

अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपींची ओळख पटली असून यामध्ये झारसुगुडा येथील बुरोमल परिसरातील रहिवासी आकाश प्रधान आणि राजा बेसन यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबतच गुन्ह्यात सहकार्य करणाऱ्या एका महिलेलाही (Women) पोलिसांनी ताब्यात घेतले. या सर्व आरोपींविरुद्ध पोलिसांनी पोक्सो कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या अत्यंत कडक आणि गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल केले.

gang rape case involving minor girl in Odisha
Bihar Crime: 14 वर्षाच्या मुलासोबत विवाहित महिलेचा 'इश्क', कुटुंबियांनी पकडले अन्...

आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे. पोलीस या प्रकरणाच्या इतरही बाजूंचा सखोल तपास करत आहेत. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये कमालीची नाराजी असून शासकीय रुग्णालयांसारख्या ठिकाणी सीसीटीव्ही आणि सुरक्षा व्यवस्था कडक करण्याची मागणी होत आहे.

gang rape case involving minor girl in Odisha
Bihar Crime: 'कोचिंगमध्ये प्रेम, हॉस्टेलमध्ये जवळीकता वाढली...'; अधिकारी होताच मुलाने दिला धोका

त्याचवेळी, पीडितेच्या पुनर्वसनाबाबत माहिती देताना झारसुगुडा बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा संजुक्ता महापात्रा यांनी सांगितले की, 17 मे च्या रात्री काही नराधमांनी मुलीला जवळच्या जंगलात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची माहिती आम्हाला पोलिसांकडून (Police) मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी करुन तिला बाल कल्याण समितीसमोर हजर केले. समितीने पीडित मुलीशी सविस्तर चर्चा केली असून तिने स्वतःवर झालेल्या अत्याचाराची संपूर्ण आपबीती सांगितली.

gang rape case involving minor girl in Odisha
Bihar Crime: जवानाने पत्नीसह दोन महिन्यांच्या तान्ह्या बाळाला जिवंत जाळले, कारण जाणून तुम्हालाही बसेल धक्का!

समितीने तिचे मानसिक समुपदेशन केले असून, सध्या तिला तिच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले. भविष्यात तिची काळजी कशी घेतली जाईल, याबाबत बाल कल्याण समिती विशेष योजना आखत आहे. पीडितेला जलद गतीने न्याय मिळावा यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com