Now probe against NCB Zonal Director Sameer Wankhede Dainik Gomantak
देश

समीर वानखेडेंची चौकशी होणार

आर्यन खान प्रकरणी NCB चे झोनल ऑफिसर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची चौकशी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

दैनिक गोमन्तक

आर्यन खान (Aryan Khan) प्रकरणी NCB चे झोनल ऑफिसर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची चौकशी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. काल गोसावी यांचा बॉडीगार्ड प्रभाकर सायील (Prabhakar Sail ) याच्या गोपयस्फोटांनंतर आर्यन खान प्रकरणाला नवीन वळण लागलेल पाहायला मिळत आहे. त्याच प्रकरणात माझ्या जीवाला धोका आहे असे सांगत प्रभाकर सायील यांनी मुंबई पोलिसांत तक्रार देखील दाखल केली आहे.

या चौकशीबद्दल अधिक माहिती देताना एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी ''आमच्या दक्षिण-पश्चिम विभागातून आम्हाला एक अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानुसार नुकतीच चौकशी सुरू झाली आहे. मुख्य दक्षता अधिकारी ही चौकशी योग्य रितीने हाताळतील. पण, कोणत्याही अधिकाऱ्यावर अशी टिप्पणी करू नये'', सांगितले आहे. त्यासाठी समीर वानखेडे यांना दिल्लीला बोलावण्याची शक्यता आहे. प्रभाकर साईलचे प्रतिज्ञापत्र महासंचालकांडे दिले असल्याने त्यात ज्यांची नावे आहेत त्यांची चौकशी होणार असल्याची माहिती देखील मिळत आहे.

समीर वानखेडे यांच्यावर आर्यन खान प्रकरणात २५ कोटींची मागणी करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप प्रभाकर साईलने केला आहे. तसेच या प्रकरणातील ८ कोटी रुपये हे समीर वानखेडे यांना जाणार होते. तसेच समीर वानखेडे यांच्याकडून जीवाला धोका असल्याचंही साईलने म्हटले आहे. त्यानंतर एनसीबीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून याची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे आणि त्यानुसारच आता समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह दिसत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: रणजी क्रिकेटमध्ये गोव्याचा कर्णधार दर्शन मिसाळ चमकला

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

Bhutani Project: ‘त्‍या’ तिघांना अटक करा! सांकवाळच्या तीस महिलांसोबत कुतिन्हो यांची मागणी

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

SCROLL FOR NEXT