Nothing Phone 3a and Nothing Phone 3a Pro: अलीकडेच स्मार्टफोनच्या बाजारात पदार्पण केलेल्या नथिंग या कंपनीने भारतात त्यांचे बहुप्रतीक्षित फोन 3A आणि 3A प्रो लॉन्च केले आहेत. हे स्मार्टफोन्स मिड-रेंज सेगमेंटमध्ये प्रीमियम अनुभव देण्याच्या उद्देशाने बाजारात लाँच करण्यात आलेत ज्यामुळे मध्यमवर्गीय ग्राहकांना परवडणाऱ्या दरात चांगले तंत्र हाताळण्याची संधी मिळेल.
नथिंगफोन 3A आणि 3A प्रोमध्ये आकर्षक डिझाईन, दर्जेदार प्रोसेसर आणि उत्कृष्ट कॅमेरा सेटअप आहे. विशेषतः फोन 3A प्रोमध्ये 3x ऑप्टिकल झूम आणि 60x डिजिटल झूम असलेला 50-मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा आहे, जो लांबच्या गोष्टींचे देखील स्पष्ट फोटो काढण्यास मदत करतो. यासोबतच, 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा देखील आहे, ज्यामुळे विविध प्रकारचे फोटो काढणे शक्य होते.
फोन 3A मध्ये 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 50-मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा आहे, जो 2x ऑप्टिकल झूम आणि 30x डिजिटल झूम देतो. सेल्फीसाठी दोन्ही फोनमध्ये 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे, ज्यामुळे उत्कृष्ट सेल्फी आणि व्हिडिओ कॉल्स करता येतात.
नथिंगच्या सिग्नेचर ग्लाइफ इंटरफेसलाही अपडेट करण्यात आलंय. आता यामध्ये फक्त प्रकाशांचे खेळ नाही, तर वैयक्तिक इच्छेनुसार वापरता येणाऱ्या या इंटरफेसमुळे नोटिफिकेशन्स आणि इनकमिंग कॉल्स अधिक आकर्षक बनणार आहेत.
दोन्ही फोनमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी आहे, जी 50W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. त्यामुळे फोन लवकर चार्ज होतो आणि जास्त वेळ वापरता येतो. अँड्रॉइड 15 वर आधारित नथिंगओएस 3.1 या फोनमध्ये देण्यात आले आहे, ज्यामुळे युजर इंटरफेस वापरण्यास अधिक सुलभ होतो.
या फोनच्या सुरुवातीच्या ऑफर्स खूपच आकर्षक आहेत. फोन 3A ची सुरुवातीची किंमत 19,999 रुपये आणि फोन 3A प्रोची सुरुवातीची किंमत 24,999 रुपये आहे. या ऑफर्समध्ये बँक डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफर्सचा समावेश आहे. त्यामुळे ग्राहकांना हे फोन परवडणाऱ्या दरात मिळवणे अगदी सहज शक्य झाले आहे.
नथिंगने हे फोन ब्लॅक, ग्रे, ब्लू आणि व्हाईट रंगांमध्ये उपलब्ध केलेत, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या आवडीनुसार रंग निवडता येतो. या फोनमध्ये IP64 डस्ट आणि स्प्लॅश रेझिस्टन्स देखील आहे, ज्यामुळे फोन सुरक्षित राहतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.