Kerala High Court.
Kerala High Court. Dainik Gomantak.
देश

Keral HighCourt on Mobile Tower : मोबाइल फोनशिवाय आज कोणीही जगू शकणार नाही ; केरळ उच्च न्यायालयाची टिप्पणी

गोमन्तक डिजिटल टीम

keral High Court On Mobile Tower Radiation

केरळ हायकोर्टाने बुधवारी सांगितले की मोबाइल फोन मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग बनले आहेत. तसेच   मोबाइल टॉवरमधून येणाऱ्या रेडिएशनचा सजिवांवर हानिकारक प्रभाव होतो, या दाव्याचे समर्थन करण्यासाठी पुराव्यांचा अभाव आहे.

एका नवीन मोबाइल टॉवर उभारण्याविरोधातील खटल्याची तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली तेव्हा न्यायमूर्ती पीव्ही कुन्हीकृष्णन यांनी ही निरीक्षणे नोंदवली.

न्यायमूर्ती कुन्हीकृष्णन यांनी जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये मोबाइल फोन कसा गुंतला आहे, यावर प्रकाश टाकला आणि म्हणाले की याचिकाकर्त्याला देखील मोबाइल फोनवर वकिलाशी संपर्क साधावा लागला असेल.

"वकील, तुमच्याकडे मोबाइल नाही का? याचिकाकर्त्याने तुम्हाला फोन करून या टॉवरची माहिती देण्यासाठी मोबाइल फोन वापरला नाही का? आजकाल मोबाइलशिवाय कोण राहू शकेल?" न्यायाधीशांनी विचारले.

मोबाइल टॉवर हानीकारक रेडिएशन उत्सर्जित करेल हे याचिकाकर्त्याला गांभीर्याने वाटत असल्याचे सांगितल्यावर, न्यायमूर्ती कुन्हीकृष्णन यांनी निदर्शनास आणले की न्यायालयाच्या यापूर्वीच्या अनेक निकालांद्वारे हा मुद्दा हाताळला गेला आहे.

हानिकारक उत्स समर्थन करण्यासाठी पुराव्यांचा अभाव असल्याचे त्यांनी सांगितले. "हे प्रकरण माझ्यापूर्वी अनेक न्यायाधिशांनी हाताळला आहे. मोबाईल टॉवर असेल तर काय होईल? रेडिएशन? याचा पुरावा कुठे आहे?" असे न्यायाधीशांनी विचारले.

वकिलांच्या वारंवार विनंतीनंतरही, न्यायालयाने बुधवारी या प्रकरणावर सुनावणी घेण्यास नकार दिला आणि उद्या, 1 जून रोजी हा मॅटर सूचीबद्ध करण्याचे आदेश दिले. "आज सुनावणी होणार नाही. आम्ही उद्याच त्यावर सुनावणी करू," असे न्यायालयाने सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा निवडणूक काळात केजरीवालांचा सेव्हन स्टार हॉटेलमध्ये मुक्काम, कोणी दिले बिल? ED ची कोर्टात माहिती

Goa Loksabha: दाबोळीत लोकशाहीचा खून, पोलिस संरक्षणात पैसे वाटल्याचा काँग्रेस उमेदवार विरियातोंचा आरोप

Goa Election 2024 Voting: गोव्यातील अनेक चर्चमधून भाजपला मतदान न करण्याचे आवाहन; माजी मंत्र्याचा गंभीर आरोप

Pastor Dominique Dsouza: उत्तर गोव्यातून तडीपार करण्याच्या कलेक्टरच्या आदेशाविरोधात डॉमनिकची कोर्टात धाव

Goa News: कामुर्लीत घराला आग लागल्याने लाखोंचे नुकसान; मोठी दुर्घटना टळली

SCROLL FOR NEXT