CM Nitish Kumar   Dainik Gomantak
देश

Bihar Politics: बिहारमध्ये नितीश कुमार सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला, भाजपचे वॉकआउट

गोमन्तक डिजिटल टीम

बिहारमध्ये नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांच्या महाआघाडी सरकारने आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. दरम्यान, यावेळी प्रमुख विरोधी पक्ष भाजपने (BJP) सभागृहातून वॉकआऊट केले. विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेदरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपने 2020 च्या विधानसभा निवडणुकीत जनता दल युनायटेडला संपवण्याचा कट रचल्याचा आरोप केला आहे.

यावेळी बोलताना नितीश कुमार म्हणाले, 'नंदकिशोर यादव यांना विधानसभा अध्यक्ष केले जाईल असे सांगितले जात असताना, विजय सिन्हा यांना अध्यक्ष करण्यात आले. 2020 मध्ये मला मुख्यमंत्री व्हायचे नव्हते, भाजपच्या दबावाखाली मुख्यमंत्री झालो. विधानसभा निवडणुकीत भाजपने जेडीयूला संपवण्याचे षडयंत्र रचले, भाजपने सर्व जुन्या नेत्यांना बाजूला केले आहे.' असा आरोप नितीश कुमार यांनी केला. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात तुम्ही (भाजप) कुठे होता. भाजपचे काम समाजात फक्त अस्वस्थता निर्माण करणे आहे. असेही नितीश कुमार म्हणाले.

केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले, केंद्राने पाटणा विद्यापीठाची मागणीही मान्य केली नाही. हर घर नलची सुरुवात 2015 मध्ये झाली होती, त्यावेळी RJD हा एकमेव मित्र होता. बिहारमध्ये रस्तेबांधणी राज्य सरकारने केली, केंद्र सरकारने नाही, अटलजी आजारी पडले तर अडवाणीजींना सत्ता मिळायला हवी होती, पण तसे झाले नाही.

सभागृहात गदारोळ करणाऱ्या भाजप नेत्यांना नितीश कुमार यांनी टोला लगावत, माझ्याविरोधात बोललात तरच तुम्हाला केंद्र सरकारकडून गौरव मिळेल. तसेच, तुम्हाला वरून सांगण्यात आले असेल म्हणून तुम्ही लोकांनी वॉकआऊट केले असा आरोप त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT