Nitish Kumar Reddy injury Dainik Gomantak
देश

India vs Australia T20I Series: सूर्या ब्रिगेडला मोठा झटका! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या तीन सामन्यांतून स्टार अष्टपैलू बाहेर; बीसीसीआयने दिली महत्त्वाची अपडेट

Nitish Kumar Reddy Injury: भारताचा स्टार खेळाडू नितीश कुमार रेड्डी हा या मालिकेतील पहिले तीन सामने खेळू शकणार नाही, अशी माहिती समोर आली आहे.

Manish Jadhav

India vs Australia T20I Series: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिका संपल्यानंतर आता 5 सामन्यांच्या टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेचा आज (29 ऑक्टोबर) पासून श्रीगणेशा झाला. मालिकेतील पहिला सामना कॅनबेरामध्ये खेळला जात आहे, परंतु सामन्याच्या सुरुवातीपूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला. भारताचा स्टार खेळाडू नितीश कुमार रेड्डी हा या मालिकेतील पहिले तीन सामने खेळू शकणार नाही, अशी माहिती समोर आली.

सूर्यकुमार यादवच्या टीमला धक्का

सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिला सामना खेळत आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच, आता भारताला प्रथम फलंदाजी करावी लागणार आहे. नाणेफेकनंतर कर्णधार 'सूर्या'ने भारताच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल माहिती दिली, तेव्हा त्यात नितीश कुमार रेड्डीचे नाव नव्हते. यावर अधिक चर्चा होण्याआधीच, बीसीसीआयने (BCCI) अधिकृत माहिती देत स्पष्ट केले की, नितीश कुमार रेड्डी हे पहिले तीन टी20 सामने खेळू शकणार नाही.

दुखापतीमुळे रेड्डी बाहेर

बीसीसीआयने (BCCI) दिलेल्या माहितीनुसार, नितीश कुमार रेड्डीला दुखापत झाली आहे. ॲडलेडमध्ये झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यादरम्यान त्याला डाव्या क्वाड्रीसेप्समध्ये (Left Quadriceps) दुखापत झाली होती. या दुखापतीतून तो सावरत असतानाच, आता त्याला मानेमध्ये कडकपणा (Neck Spasm) जाणवत असल्याची तक्रार त्याने केली. यामुळे त्याच्या दुखापतीतून बरे होण्याच्या प्रक्रियेवर आणि हालचालींवर परिणाम झाला आहे.

बीसीसीआयने सांगितले की, वैद्यकीय पथक (Medical Team) त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. तो पुढील दोन सामन्यांमध्ये खेळू शकेल की नाही, हे मेडिकल रिपोर्टनंतरच स्पष्ट होईल.

भारताची प्लेइंग XI: अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Birch Fire Case: हडफडे अग्निकांडातील मुख्य आरोपी लुथरा बंधू उद्या गोव्यात होणार दाखल; ट्रान्झिट रिमांड मिळाल्याने कारवाईला वेग VIDEO

IPL Mini Auction 2026: धोनीच्या चेन्नईत नव्या दमाच्या खेळाडूंची एन्ट्री! दोन अनकॅप्ड खेळाडूंवर 28 कोटींची उधळण; प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा कोट्यधीश

"लग्न केवळ कागदावर उरलं असेल तर ते तोडणंच बरं!" 24 वर्षांपासून रखडलेल्या घटस्फोटाच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

SCROLL FOR NEXT