NIA  Dainik Gomantak
देश

NIA: दिल्ली-पंजाबसह चार राज्यांमध्ये NIAचे अनेक ठिकाणी छापे; अमली पदार्थ तस्करीबाबत मोठी कारवाई

NIA ने दिल्ली-NCR, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये दहशतवादी आणि ड्रग तस्कर यांच्यातील संबंध संपवण्यासाठी अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत.

दैनिक गोमन्तक

दहशतवादी आणि ड्रग्ज तस्कर यांच्यातील संबधांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. एनआयए (नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी) ने आज पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि दिल्ली-एनसीआर प्रदेशातील अनेक ठिकाणी छापे टाकून दहशतवादी, गुंड आणि भारत आणि परदेशातील अमली पदार्थांची तस्कर यांच्यातील संबंध संपवण्यासाठी अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत.

(NIA raids at multiple locations in four states including Delhi-Punjab; A major crackdown on drug trafficking)

एनआयएचे हे छापे दिल्ली, हरियाणा, राजस्थान आणि पंजाबमधील 40 हून अधिक वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहेत, ज्यामध्ये अनेक पथके सहभागी आहेत.

यापूर्वी 14 ऑक्टोबर रोजी एनआयएने ड्रोन डिलीव्हरी प्रकरणात जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यासह अनेक ठिकाणी शोध घेतला होता. एनआयएच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात आतापर्यंत कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही. गेल्या नऊ महिन्यांत, सुरक्षा दलांनी शेजारच्या पाकिस्तानमधून 191 ड्रोन भारतीय हद्दीत बेकायदेशीरपणे घुसल्याचे पाहिले आहे, ज्यामुळे देशातील अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने मोठी चिंता निर्माण झाली आहे.

एनआयएचा हा छापा तीन मुद्द्यांच्या तपासासाठी आहे.

-गँगस्टर आणि अंमली पदार्थांच्या तस्करीचे कनेक्शन

-गुंडांचे जाळे वेगवेगळ्या राज्यात पसरले

दहशतवादी आणि अंमली पदार्थांची तस्करी यांचा संबंध

असे देखील सांगितले जात आहे की बहुतेक छापे हरियाणा, उत्तराखंड आणि पंजाबमध्ये आहेत. मात्र, दिल्लीत ते लाल बवाना परिसरात नीरज बवाना यांच्या अड्ड्यावर आहे. हा छापा टॉप मोस्ट गँगस्टरवर टाकलेल्या छाप्याचा दुसरा भाग आहे. नीरज बवाना, बॉम्बे गँग, लॉरेन्स बिश्नोई गँग, नासिर, चेनू, गोगी, काला जेठेडी आणि गोल्डी ब्रार यांच्यासह इतर सर्व गुंडांच्या ठिकाणांवर छापे टाकले जात आहेत. या गुंडांचे मदतनीसही एनआयएच्या रडारवर आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

SCROLL FOR NEXT