INC President Poll: काँग्रेस अध्यक्षपदासाठी मतदान सुरू, खर्गे आणि थरूर मैदानात ; दहा मुद्दे

19 ऑक्टोबर रोजी या निवडणूकीचा निकाल जाहीर होणार आहे.
Congress President Election
Congress President ElectionDainik Gomantak
Published on
Updated on

देशातील सर्वात जुन्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी आज मतदान (Congress President Polls) होत आहे. अनेक दिवसांपासून काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूकीकडे (Congress President Election) सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यात पक्षाध्यक्षपदाचा सामना रंगणार आहे. दिल्लीतील असलेले पक्षाचे मुख्यालयात आणि देशभरातील 65 हून अधिक केंद्रांवर आज मतदान होणार आहे. 19 ऑक्टोबर रोजी या निवडणूकीचा निकाल जाहीर होणार आहे.

काँग्रेस पक्षाच्या 137 वर्षांच्या इतिहासात आज सहाव्यांदा पक्षाध्यक्षपदासाठी मतदान होत आहे. 24 वर्षानंतर नेहरू-गांधी घराण्याव्यतिरिक्त कोणीतरी अध्यक्षपदाच्या खुर्चीवर विराजमान होणार आहे.

आजच्या मतदानात माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहूल गांधी, प्रियंका गांधी वड्रा, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह तसेच, अध्यक्षपदाचे उमेदवार मल्लिकार्जुन खर्गे यांनी देखील मदतान केले.

Sonia Gandhi
Sonia Gandhi Dainik Gomantak
Congress President Election
Diwali Gift: चेन्नईतील 'या' ज्वेलरी शॉपच्या कर्मचाऱ्यांची दिवाळीपूर्वीच चांदी

मल्लिकार्जुन खर्गे हे अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. गांधी घराण्याशी जवळीक आणि अनेक ज्येष्ठ नेत्यांचा पाठिंबा यामुळे खर्गे हे पक्षाध्यक्षपदाच्या अधिक बळकट मानले जात आहेत.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी निवडणूकीबाबत बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे. अशा पदांसाठी मी नेहमीच काँग्रेसच्या मॉडेलवर अवलंबून असतो. जवाहरलाल नेहरूंनंतरच्या काळात या मॉडेलवर सर्वाधिक विश्वास होता.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांचे समर्थन केले आहे. खर्गे यांच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन त्यांनी काँग्रेस नेत्यांना केले आहे.

Dr. Manmohan Singh
Dr. Manmohan Singh Dainik Gomantak
Congress President Election
PM मोदींकडून शेतकऱ्यांना कोणतं दिवाळी गिफ्ट मिळणार? वाचा एका क्लिकवर

काँग्रेस अध्यक्षपदाची शेवटची निवडणूक 2000 मध्ये झाली होती, यावेळी जितेंद्र प्रसाद आणि सोनिया गांधी यांच्यात लढत झाली होती. प्रसाद यांचा यावेळी दारुण पराभव झाला होता.

24 वर्षानंतर पहिल्यांदाच होत असलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीत सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधी वड्रा अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला आहे.

काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी बुधवारी सांगितले की, काँग्रेस अध्यक्षपदाची निवड गुप्त मतदानाद्वारे होणार असून कोणी कोणाला मतदान केले हे कोणालाच कळणार नाही. दोन्ही उमेदवारांना समान संधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Rahul Gandhi
Rahul Gandhi Dainik Gomantak
Congress President Election
Viral Video: शाळेच्या बसमध्ये महाकाय अजगर! दोन तासांच्या प्रयत्नानंतर केली सुटका

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे देशभरातील लोकांचे तसेच सत्ताधारी पक्ष भाजपसह सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. निवडणूक कशी होते आणि काँग्रेसच्या नूतन अध्यक्षपदी कोणाची निवड होते हे सगळ्यांनाच पाहायचे आहे. याबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येही उत्साह दिसून येत आहे.

Priyanka Gandhi Wadra
Priyanka Gandhi Wadra Dainik Gomantak

पक्षाध्यक्षपदासाठी आज सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार आहे. अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणूकीत कोण बाजी मारणार याकडे सर्व देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com