NIA Dainik Gomantak
देश

Jammu and Kashmir मध्ये NIA ची मोठी कारवाई, पाकिस्तानी नागरिकासह दोन आरोपींविरुद्ध चार्जशीट दाखल!

NIA: जम्मू-काश्मीरमधील शांतता आणि सलोखा बिघडवण्याच्या योजनेशी संबंधित दहशतवादी कट प्रकरणात मोठी कारवाई केली आहे.

Manish Jadhav

Jammu and Kashmir: राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) हिंसाचार आणि दहशतवादी कृत्यांमधून जम्मू-काश्मीरमधील शांतता आणि सलोखा बिघडवण्याच्या योजनेशी संबंधित दहशतवादी कट प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. एनआयएने या दहशतवादी कट प्रकरणात एका पाकिस्तानी नागरिकासह दोन आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. मोहम्मद उबेद मलिक (रा. कुपवाडा जिल्हा, जम्मू-काश्मीर) आणि मोहम्मद दिलावर इकबाल उर्फ ​​माझ खान काश्मिरी उर्फ ​​माझ खान उर्फ ​​माझ काश्मिरी उर्फ ​​आझाद काश्मिरी (रा. अब्बासपूर, पीओके) अशी आरोपींची नावे आहेत.

NIA काय म्हटले?

एनआयएने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दोघेही सुरक्षा दलांवर आणि तथाकथित 'बाहेरील लोकांवर' हल्ला करुन जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करण्याच्या गुन्हेगारी कटात सामील होते.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, "जैश-ए-मोहम्मद (जेएम) प्रमुख मौलाना मसूद अझहर अल्वीचा जवळचा सहकारी दिलवर हा बंदी घातलेल्या दहशतवादी संघटना आणि त्याच्या साथीदारांनी दहशतवादी कारवाया करण्यासाठी रचलेल्या मोठ्या कटाचा एक भाग आहे." तो काश्मिरी तरुणांना प्रेरित करण्यात गुंतला होता.

दुसरीकडे, एनआयएच्या तपासानुसार उबेदला जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी संघटनेत सामील होण्यास प्रवृत्त करण्यात दिलवार जबाबदार होता. दिलवार हिंसक ऑडिओ क्लिप शेअर करायचा, ज्यामध्ये मौलाना मसूद अझहर अल्वीचे फोटो, व्हिडिओ असत. तो काश्मीर खोऱ्यातील चकमकींशी संबंधित व्हिडिओ पाठवत असे आणि तरुणांना शस्त्र उचलण्यास प्रवृत्त करत असे. आरोपींवर IPC, 1860 च्या कलम 120B आणि 121A आणि UA(P) कायदा, 1967 च्या कलम 18, 18B, 20 आणि 38 अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत.

एनआयएने 2022 मध्ये गुन्हा दाखल केला होता

दहशतवादी कट प्रकरण (RC-05/2022/NIA/JMU) NIA द्वारे 21 जून 2022 रोजी स्वतःहून नोंदवले. जम्मू आणि काश्मीरमध्ये बॉम्ब, आयईडी आणि लहान शस्त्रे वापरुन दहशतवादी हल्ले करण्यासाठी दहशतवादी संघटनांनी रचलेल्या कटाशी संबंधित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Sand Mining: सावर्डे सत्तरीत बेकायदेशीर रेती उत्खनन; एका महिलेचा म्हादईत बुडून मृत्यू

Goa Crime: तिसवाडीत 15 वर्षीय मुलीचे अपहरण, ओडिशातील तरुणाविरोधात गुन्हा नोंद; पोलिस तपास सुरु!

Tuberculosis: क्षय रोगाला हद्दपार करण्यासाठी मिळाले स्टार बूस्ट!! वर्षा उसगावकर आणि जॉन डी सिल्वा गोव्याचे 'टीबी ब्रँड ॲम्बेसेडर'

Mormugao Port: गोव्यात क्रूझ पर्यटन हंगाम सुरू; एकाच दिवशी कॉर्डेलिया आणि जर्मनीहून जहाजं दाखल

Goa Agriculture: गोव्यात यंदा पोफळीच्या लागवडीत 18 हेक्टरने वाढ! सत्तरीत सर्वाधिक लागवड

SCROLL FOR NEXT