Bus Accident in Doda Jammu-Kashmir: जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये 250 मीटर खोल दरीत कोसळली बस; 36 हून अधिक जणांचा मृत्यू, 17 जखमी

Jammu- Kashmir: जम्मू-काश्मीरमधील डोडा येथे एक मोठा रस्ते अपघात झाला.
Bus Accident in Doda Jammu-Kashmir
Bus Accident in Doda Jammu-KashmirTwitter/ @ANI

Bus Accident in Doda Jammu- Kashmir: जम्मू-काश्मीरमधील डोडा येथे एक मोठा रस्ते अपघात झाला. येथे किश्तवाडहून जम्मूला जाणारी बस डोडा येथील असार भागातील त्रंगलजवळ 250 मीटर खोल दरीत कोसळली. घटनास्थळी पोलीस आणि बचाव पथकाचे जवान उपस्थित असून जखमींना बाहेर काढण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे.

बसमध्ये किती लोक प्रवास करत होते हे अद्याप समोर आलेले नाही. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अपघातात किमान 36 किंवा त्याहून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. तर 17 हून अधिक जण जखमी झाले आहेत. सध्या पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनीही ट्विट करुन अपघाताची माहिती दिली आहे. सिंह म्हणाले की, मी डोडा उपायुक्त हरविंदर सिंग यांच्याशी बोललो आहे. जखमींना किश्तवाडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आणखी काही लोकांवर पुढील उपचारासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात येत आहे. आवश्यक ती सर्व मदत घटनास्थळी पाठवली जात आहे. मी सतत संपर्कात असून बचाव कार्यावर पूर्णपणे लक्ष ठेवले जात आहे.

या घटनेनंतर स्थानिक लोकांनी तातडीने बचावकार्य सुरु केले. बसमध्ये (Bus) जवळपास 55 लोक होते. अशा परिस्थितीत मृतांचा आकडाही वाढू शकतो.

Bus Accident in Doda Jammu-Kashmir
Jammu and Kashmir: काश्मीरमध्ये पुन्हा 'टार्गेट किलिंग', यूपीच्या मुकेशची दहशतवाद्यांकडून गोळ्या झाडून हत्या

दुसरीकडे, जम्मू-काश्मीरचे (Jammu And Kashmir) लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, 'असार येथे झालेल्या बस अपघातामुळे मी अत्यंत दु:खी आहे. जखमी प्रवासी लवकर बरे होण्याची कामना करतो. मृतांच्या कुटुंबियांप्रती माझ्या मनापासून संवेदना आहेत. जिल्हा प्रशासनाला सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिले आहेत.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com