Mohammed Siraj Appointed Captain Dainik Gomantak
देश

Mohammed Siraj Appointed Captain: सिराज आता 'कॅप्टन कूल'च्या भूमिकेत; हैदराबाद संघाचं करणार नेतृत्व!

Mohammed Siraj Appointed Captain: भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून, टीम इंडियाच्या गोलंदाजीचा तो मुख्य कणा मानला जातो.

Sameer Amunekar

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका (ODI Series) खेळवली जात आहे. ही मालिका सध्या १-१ अशा अटीतटीच्या स्थितीत पोहोचली आहे. मात्र, याच दरम्यान सिराजच्या चाहत्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा हा 'मियाँ मॅजिक' आता केवळ मैदानावर विकेट्स घेतानाच नाही, तर आपल्या संघाचे नेतृत्व करतानाही दिसणार आहे.

हैदराबाद रणजी संघाचे नेतृत्व सिराजकडे

हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने (HCA) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत मोहम्मद सिराजला रणजी ट्रॉफीच्या उर्वरित हंगामासाठी हैदराबाद संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. सिराज सध्याच्या भारतीय संघातील सर्वात वरिष्ठ आणि अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. त्यामुळे त्याच्या अनुभवाचा फायदा राज्याच्या संघाला मिळावा, या उद्देशाने निवड समितीने ही जबाबदारी त्याच्या खांद्यावर सोपवली आहे. तो राहुल सिंहच्या जागी ही कमान सांभाळणार असून, राहुल सिंह आता उपकर्णधार म्हणून त्याला साथ देईल.

निवड समितीचा विश्वास

हैदराबाद निवड समितीचे प्रमुख पी. हरिमोहन यांनी याबद्दल अधिकृत घोषणा करताना सांगितले की, "आम्ही सिराजशी सविस्तर चर्चा केली आहे आणि तो उर्वरित हंगामासाठी उपलब्ध आहे. सिराज हा मैदानावर लढाऊ वृत्तीने खेळणारा खेळाडू आहे. तो नेहमी विजयासाठी प्रयत्न करतो. त्याच्या उपस्थितीमुळे आणि नेतृत्वामुळे प्रतिस्पर्धी संघांच्या अडचणी वाढतील, याची आम्हाला खात्री आहे." विशेष म्हणजे, सिराजने यापूर्वी कधीही व्यावसायिक स्तरावर नेतृत्व केलेले नाही, त्यामुळे ही त्याच्यासाठी एक मोठी कसोटी असणार आहे.

हैदराबाद संघाची स्थिती आणि पुढील आव्हाने

रणजी ट्रॉफी २०२५-२६ च्या 'ग्रुप डी' मध्ये हैदराबादचा संघ सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत खेळलेल्या पाच सामन्यांपैकी त्यांना फक्त एका विजयावर समाधान मानावे लागले आहे. अशा परिस्थितीत, बाद फेरीत (Knockout) पोहोचण्यासाठी हैदराबादला उर्वरित सामने जिंकणे अत्यंत आवश्यक आहे. २२ जानेवारी रोजी हैदराबादचा सामना बलाढ्य मुंबई विरुद्ध होणार आहे, तर २९ जानेवारीला त्यांचा मुकाबला छत्तीसगडशी होईल. सिराजच्या आगमनामुळे हैदराबादचा संघ पुन्हा जोमाने पुनरागमन करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

America Iran Tension: "यावेळी गोळीचा निशाणा चुकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांना इराणची खुली धमकी; सरकारी टीव्हीवर हत्येच्या प्रयत्नाचे फोटो दाखवल्याने खळबळ

Goa Winter Session 2026: चिंबल ग्रामस्थांची विधानसभेवर धडक, 'युनिटी मॉल' रद्द करण्यासाठी सरकारला अल्टिमेटम; सभागृहात विरोधकांचा आक्रमक अवतार! VIDEO

मशाल मिरवणुकीत लोकप्रतिनिधींनी सहभागी व्हावे! तुये हॉस्पिटल कृती समितीचे आवाहन; अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

फूड स्ट्रीटचे पाच टक्के बांधकाम पाडा! पालिकेला नोटीस; अन्यथा अवमान याचिका दाखल करणार

Goa Assembly Live: विश्वजीत-युरींत जुंपली!

SCROLL FOR NEXT