Students Dainik Gomantak
देश

Modi Govt ने दिली मोठी भेट! आता जेईई मेन अन् इतर स्पर्धा परीक्षांचे कोचिंग मिळणार मोफत

Jee Main Free Coaching: देशातील जेईई मेन आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.

Manish Jadhav

Jee Main Free Coaching: देशातील जेईई मेन आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता हे विद्यार्थी आयआयटी आणि आयआयएससीच्या प्राध्यापकांकडून मोफत कोचिंग घेऊ शकणार आहेत.

याबाबत, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने सोमवारी एक उपक्रम सुरु करण्यात येणार आहे. जिथे IIT आणि IISc च्या प्राध्यापकांचे (Professors) रेकॉर्ड केलेले व्हिडिओ अपलोड केले जातील.

दरम्यान, यूजीसीचे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की, साथी (SATHEE) नावाचे व्यासपीठ केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने तयार केले आहे. जे सोमवारी म्हणजेच सोमवारी लाँच होणार आहे.

जेईई मेन्ससह इतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आयआयटी आणि आयआयएससीचे प्राध्यापक या पोर्टलवर लेक्चर्स अपलोड करतील. आयआयटी कानपूरच्या मदतीने हे पोर्टल तयार करण्यात आले आहे.

दुसरीकडे, प्रतिकूल परिस्थितीतून किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातून आलेले विद्यार्थी (Students) सहज स्पर्धा परीक्षांची तयारी करु शकतील, यासाठी या व्यासपीठाची रचना करण्यात आल्याचे यूजीसीचे अध्यक्ष म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, अनेकदा कोचिंगच्या मोठ्या खर्चामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील मुले तयारी करु शकत नाहीत. त्यामुळे त्यांना त्यांची स्वप्ने पूर्ण करता येत नाहीत.

तसेच, अशा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणही सहज मिळून स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात, यासाठी साथी पोर्टल सुरु करण्यात येत आहे. पोर्टलवर अपलोड केलेले व्हिडिओ पाहून आणि ऐकून मुले सहज तयारी करु शकतील.

यापूर्वी, UGC चेअरमन यांनी UG CUET परीक्षा अर्ज भरण्यासाठी मदत केंद्रांबद्दल देखील माहिती दिली होती. यूजीसीकडून मदत केंद्रे सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिथे, विद्यार्थी विनामूल्य फॉर्म भरु शकतील. या केंद्रांची माहिती एनटीएच्या वेबसाइटवर दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले होते.

आता, CUET परीक्षा देशभरातील केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी घेतली जाते. या स्कोअरकार्डच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. गेल्या वर्षी काही विद्यापीठांनी सहभाग घेतला नव्हता, मात्र यावेळी, जवळपास सर्वच केंद्रीय विद्यापीठे सहभागी होत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

Margao: मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे नाईलाजाने स्थलांतर! इमारतीची परिस्थिती भीतीदायक; जिल्हा इस्पितळातून राहणार कार्यरत

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT