Delhi Deputy CM Manish Sisodia: मनीष सिसोदियांना न्यायालयाने सुनावली 4 मार्चपर्यंत सीबीआय कोठडी

CBI: दिल्लीचे डेप्युटी सीएम मनीष सिसोदिया यांना राऊस एव्हेन्यू कोर्टातून मोठा धक्का बसला आहे.
Delhi Deputy CM Manish Sisodia
Delhi Deputy CM Manish SisodiaDainik Gomantak
Published on
Updated on

Delhi Deputy CM Manish Sisodia: दिल्लीतील राऊस एव्हेन्यू येथील विशेष सीबीआय न्यायालयाने दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांना दारु घोटाळ्याप्रकरणी पुढील चौकशीसाठी 4 मार्चपर्यंत 5 दिवसांच्या सीबीआय कोठडीत पाठवले आहे.

दरम्यान, न्यायालयाने सिसोदिया यांना 4 मार्च रोजी पुन्हा न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. सीबीआयने (CBI) रविवारी संध्याकाळी सिसोदिया यांची जवळपास 9 तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली.

सिसोदिया यांच्या अटकेनंतर दिल्लीतील राजकारण आता चांगलेच तापले आहे. या घडामोडींमुळे भाजप (BJP) आणि आपमधील राजकीय दरी आणखी वाढू शकते.

Delhi Deputy CM Manish Sisodia
Manish Sisodia Arrested: केजरीवालांचा अंदाज ठरला खरा; दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांना CBI ने केली अटक

दुसरीकडे, सीबीआय एफआयआरमध्ये आरोपी क्रमांक एक म्हणून नाव असलेले मनीष सिसोदिया यांची मागील वर्षी 17 ऑक्टोबर रोजी चौकशी करण्यात आली होती. एका महिन्यानंतर, गेल्या वर्षी 25 नोव्हेंबर रोजी एजन्सीने आरोपपत्र दाखल केले.

सीबीआयने आरोपपत्रात सिसोदिया यांचे नाव दिले नव्हते, कारण तपास संस्थेने त्यांच्या आणि इतर संशयित आणि आरोपींविरुद्ध तपास सुरु ठेवला होता.

तसेच, 2021-22 च्या मद्य धोरणाच्या विविध पैलूंवर सुमारे 9 तासांच्या चौकशीनंतर रविवारी संध्याकाळी सिसोदिया यांना अटक करण्यात आली. उत्पादन शुल्क धोरणाची निर्मिती आणि अंमलबजावणी या दोन्हीमध्ये अनियमितता असल्याचे तपास एजन्सीचे म्हणणे आहे.

Delhi Deputy CM Manish Sisodia
Manish Sisodia: एक दिवसांपूर्वी केजरीवालांना नोटीस आज मंत्री सिसोदियांच्या घरी CBI चा छापा

त्याचबरोबर, सिसोदिया यांच्या उत्तराने सीबीआयचे अधिकारी समाधानी झाले नाहीत. त्यानंतर, सिसोदिया यांना तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप करत अटक करण्यात आली.

सीबीआयने एका निवेदनात म्हटले आहे की, सिसोदिया यांनी प्रश्नांची उडवाउडवीची उत्तरे दिली आणि पुरावे दाखवूनही तपासात सहकार्य केले नाही, त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

CJP Protest Violence Pakistan Social Media Connection
CJP Protest: "शांततापूर्ण आंदोलन हा घटनात्मक अधिकार!" विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज पोलिसांना नडला; दडपशाही रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा मास्टरप्लॅन
Delhi youth protest parliament march
CBI Chargesheet
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com