Prime Minister Narendra Modi  Dainik Gomantak
देश

Women Reservation: मोदी कॅबिनेटचा ऐतिहासिक निर्णय, महिला आरक्षण विधेयकाला दिली मंजूरी

Women Reservation Bill: सोमवारपासून सुरु झालेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाची बैठक संसदेच्या जुन्या इमारतीत पार पडली.

Manish Jadhav

Women Reservation Bill: सोमवारपासून सुरु झालेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाची बैठक संसदेच्या जुन्या इमारतीत पार पडली. दुसऱ्या दिवशी म्हणजेच उद्यापासून संसदेचे कामकाज नव्या सभागृहात सुरु होईल.

दरम्यान, सोमवारी संध्याकाळी पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली, यामध्ये त्यांनी महिला आरक्षण विधेयकाला मंजूरी दिली.

आता हे विधेयक संसदेत मांडले जाणार आहे. अनेक दशकांपासून या विधेयकावर चर्चा झालेली नाही.

महिला आरक्षण विधेयक मंजूर

वास्तविक, जे अंदाज बांधले जात होते तेच झाले. मोदी मंत्रिमंडळाने महिला आरक्षण (Reservation) विधेयकाला मंजूरी दिली. मंगळवारी ते सभागृहात मांडले जाणार आहे. सरकार 33 टक्के महिला आरक्षण विधेयक आणणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

आता हे विधेयक मंजूर झाल्यास लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी 33 टक्के जागा राखीव होतील. असे झाल्यास आगामी निवडणुकीत अनेक राज्यांची गणिते बदलतील.

अनेक आश्चर्यकारक पावले

दरम्यान, सध्याच्या लोकसभेत 78 महिला (Women) सदस्य निवडून आल्या आहेत, जे प्रमाण एकूण 543 च्या 15 टक्क्यांपेक्षा कमी आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सरकारने संसदेत दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यसभेतही महिलांचे प्रतिनिधित्व सुमारे 14 टक्के आहे. संसदेच्या पाच दिवसांच्या अधिवेशनात अनेक आश्चर्यकारक पावले उचलली जाऊ शकतात, असेही सांगण्यात येत आहे.

चित्र स्पष्ट दिसत आहे

सध्या महिला आरक्षण विधेयकाबाबत चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. या विधेयकावर भाजप आणि काँग्रेसचे आधीच एकमत झाले आहे.

यापूर्वी बीजेडी आणि बीआरएससह अनेक पक्षांनी हे विधेयक आणण्याची मागणी केली होती, तर हैदराबाद झालेल्या सीडब्ल्यूसीच्या बैठकीत काँग्रेसनेही महिला आरक्षणाबाबत ठराव मंजूर केला होता. 27 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महिला आरक्षण विधेयकाचे दिवस आता आलेले दिसत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT