MP Assembly Election 2023: मध्य प्रदेशातील सत्ताधारी भाजपने सोमवारी काँग्रेसवर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाच्या जन आक्रोश यात्रेचे थीम सॉन्ग चोरल्याचा आरोप केला.
यावर काँग्रेसने पलटवार करत दावा केला की, 'हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी पाकिस्तानी पक्षाच्या गाण्याची नक्कल केली आणि त्याचा भाजपने राजस्थानमध्ये (निवडणूक प्रचारात) वापर केला होता.'
काँग्रेसची जनआक्रोश यात्रा 19 सप्टेंबरपासून राज्यातील सात ठिकाणांहून निघणार आहे. या वर्षी नोव्हेंबरमध्ये राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत.
जन आक्रोश यात्रेसाठी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'चलो, चलो काँग्रेस के संग चलो' या गाण्यात 'चलो इम्रान के साथ' काँग्रेसने कॉपी केल्याचा आरोप भाजपच्या (BJP) मध्य प्रदेश युनिटचे सचिव राहुल कोठारी यांनी केल्याने वाद सुरु झाला. जे पाकिस्तान तेहरीकचे थीम सॉंग आहे.
भाजपच्या मध्य प्रदेश युनिटने 'एक्स' अकाउंटवर काँग्रेसच्या निवडणूक प्रचार गीतासह पाकिस्तानी पक्षाच्या थीम सॉंगचा व्हिडिओ शेअर केला आहे.
कोठारी यांनी आरोप केला की, 'आतापर्यंत काँग्रेस पाकिस्तानच्या बाजूने आणि भारताच्या विरोधात घोषणा देणाऱ्यांना स्वीकारत आला आहे.' ते पुढे म्हणाले की, 'आता काँग्रेसच्या मध्य प्रदेश युनिटने पाकिस्तानचे संगीत देखील स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.'
काँग्रेसचे (Congress) राज्यसभा सदस्य दिग्विजय सिंह जन आक्रोश यात्रेच्या पोस्टरमधून गायब आहेत, मात्र ते पार्श्वसंगीत देत असल्याचा दावा त्यांनी केला.
ही तुष्टीकरणाची हद्द असल्याचेही ते पुढे म्हणाले. काँग्रेसचा झेंडा लवकरच पूर्णपणे हिरवा झाला तर फार नवल करण्याची गोष्ट असणार नाही, असा दावाही त्यांनी केला.
भाजपने 'एक्स'वर लिहिले की, 'काँग्रेसचे पाकिस्तान प्रेम पुन्हा समोर आले आहे. मध्य प्रदेश निवडणुकीतील प्रचार गीतासाठी काँग्रेसने पाकिस्तानातील इम्रान खान यांच्या पक्षाचे थीम साँग चोरले. काँग्रेसची चोरी करण्याची ही जुनी सवय आहे, पण पाकिस्तानवर एवढं प्रेम का? काँग्रेसने उत्तर द्यावे.'
यावर प्रदेश काँग्रेस मीडिया विभागाचे अध्यक्ष केके मिश्रा म्हणाले की, 'दुर्दैवाने पाकिस्तानचे मित्र असलेले लोक काँग्रेसच्या प्रचार गीतावर आक्षेप घेत आहेत. निवडणुकीत फायदा घेण्यासाठी लष्कराच्या जवानांना शहीद करणाऱ्यांनी एका गाण्यावर आक्षेप घेतला आहे.'
निमंत्रण न देता पाकिस्तानात कोण गेले होते आणि शेजारील देशाच्या पंतप्रधानांना त्यांच्या शपथविधी समारंभाला कोणी बोलावले होते, हे भाजप बहुधा विसरला आहे, असेही ते मिश्रा म्हणाले.
मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी आरोप केला की, 'कमलनाथ (काँग्रेसच्या मध्य प्रदेश युनिटचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री) 'चलो चलो' म्हटल्यामुळे मागील काँग्रेस सरकारने आपली विश्वासार्हता गमावली होती. विधानसभा निवडणुकीत जनता काँग्रेसला ‘चलो-चलो’ म्हणणार आहे.'
दुसरीकडे, कमलनाथ यांचे मीडिया सल्लागार पीयूष बबेले यांनी राजस्थान आणि हरियाणामधील निवडणूक प्रचारादरम्यान भाजपने पाकिस्तानी पक्षाचे थीम सॉन्ग चोरल्याचा आरोप केला.
बबेले 'X' वरील पोस्टमध्ये म्हणाले की, "भाजपचा एकमेव मंत्र चोरी आणि फसवणूक आहे. हरियाणाच्या भाजप सरकारचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी इम्रान खान (की पार्टी) यांच्या पक्षाचे थीम सॉन्गची नक्कल केली आहे. चित्रपट तज्ञ नरोत्तम मिश्रा जी, दोन्ही गाणी ऐका आणि सांगा इतकं पाकिस्तान-देशप्रेम कुठून येतं.''
दुसरीकडे, काँग्रेसने 17 सप्टेंबर रोजी ‘चलो, चलो...’ हे गीत लॉन्च केले. भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि दलित आणि महिलांवरील गुन्हे अशा विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यासाठी ही यात्रा 15 दिवसांत मध्य प्रदेशातील सर्व 230 विधानसभा मतदारसंघांतून 11,400 किलोमीटरचे अंतर कापणार आहे.
जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी भाजपने याआधीच 'जन आशीर्वाद यात्रा' सुरु केली असून, विविध ठिकाणांहून काढण्यात येणाऱ्या यात्रेची 25 सप्टेंबर रोजी भोपाळमध्ये सांगता होणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.