Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: फॅशन शोमध्ये टाळ्यांचा कडकडाट थांबला अन् अचानक किंकाळी घुमली, पुढं काय झालं ते तुम्हीच बघा? मॉडेलचा व्हिडिओ व्हायरल

Model Falls Off Ramp: एका फॅशन शो दरम्यान रॅम्प वॉक करत असताना एका मॉडेलचा भीषण अपघात झाला, ज्याने तिथे उपस्थित प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकला.

Manish Jadhav

Model Falls Off Ramp: फॅशन शो म्हटलं की डोळ्यांसमोर येते ती झगमगाटी दुनिया, हाय-हील्स, स्टायलिश कपडे आणि मॉडेल्सचा आत्मविश्वासपूर्ण 'कॅटवॉक'. मात्र, या चमकधमक असलेल्या जगामागे किती मोठा धोका दडलेला असतो, याची प्रचिती देणारा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एका फॅशन शो दरम्यान रॅम्प वॉक करत असताना एका मॉडेलचा भीषण अपघात झाला, ज्याने तिथे उपस्थित प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकला.

नेमकी घटना काय?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या क्लिपमध्ये एक मॉडेल अत्यंत आत्मविश्वासाने रॅम्पवर चालताना दिसत आहे. तिचे कपडे, तिचा मेकअप आणि चालण्यातील तोल अगदी परिपूर्ण होता. प्रेक्षकही तिच्या प्रत्येक स्टेपचे कौतुक करत होते. मात्र, रॅम्पच्या शेवटच्या टोकावर पोहोचल्यानंतर काहीतरी विपरीत घडले. मॉडेलचे लक्ष रॅम्प संपत असल्याकडे गेले नाही आणि पुढचे पाऊल हवेत पडल्यामुळे तिचा तोल गेला. काही सेकंदातच ती मॉडेल थेट स्टेजवरुन खाली कोसळली.

प्रेक्षकांमध्ये भीती

ज्या क्षणी ही मॉडेल खाली पडली, त्या क्षणी संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली. गाण्याचा आवाज आणि टाळ्यांचा कडकडाट अचानक थांबला. तिथे उपस्थित असलेले काही प्रेक्षक भीतीने उभे राहिले, तर काहींच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव स्पष्ट दिसत होते. हा अपघात इतक्या वेगाने झाला की, कोणालाही सावरण्याची संधी मिळाली नाही. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरील 'hyderabad_ki_awaam' नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला असून लाखो लोकांनी तो पाहिला आहे.

ग्लॅमरच्या जगामागचे कठीण वास्तव

हा व्हिडिओ पाहून नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी त्या मॉडेलच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली. तर काहींनी असे म्हटले की, फॅशन शोमध्ये रॅम्पवर चालणे हे दिसते तितके सोपे नसते. मॉडेलला केवळ तिच्या लुकवर नाही, तर रॅम्पची लांबी, तिथे असलेल्या लाइट्स आणि पाय ठेवण्याच्या जागेकडेही बारकाईने लक्ष द्यावे लागते. थोडं जरी लक्ष विचलित झालं तरी असा गंभीर अपघात घडू शकतो.

सोशल मीडियावर या व्हिडिओने एका नवीन चर्चेला तोंड फोडले आहे. अनेकवेळा मॉडेल्सना अशा कपड्यांमध्ये किंवा हील्समध्ये वॉक करावा लागतो जे अतिशय आव्हानात्मक असतात. अशा परिस्थितीत त्यांची सुरक्षा किती महत्त्वाची आहे, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Winter Session 2026: विधानसभेत विधेयकांचा 'पंच'! शिक्षण, कृषी, व्यापार अन् पंचायतींसाठी कायदे मंजूर; अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी राज्याच्या हिताचे मोठे निर्णय

Operation Sindhur: 'ऑपरेशन सिंदूर'चा थरार! भारतीय लष्कराने जारी केला सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडिओ; पाकच्या एअरबेस आणि रडार यंत्रणेच्या विध्वंसाचा पुरावा जगासमोर

"ऑपरेशन सिंदूर सर्वात मोठा हल्ला, अल्लाहनचं आम्हाला वाचवलं," लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरची जाहीर कबुली; पाकड्यांचा पुन्हा बुरखा फाटला

Goa Winter Session 2026: "आधार कार्ड म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नाही!" मुख्यमंत्री सावंतांनी विधानसभेत स्पष्टचं सांगितलं; मतदार यादीतून गैर-नागरिकांची नावं हटवणार

Indian Army: भविष्यातील युद्धांसाठी भारतीय सेना सज्ज! 'फ्युचर रेडी' फोर्स म्हणून जगात ठरणार वरचढ, लष्करप्रमुखांनी शत्रूंना दिली तंबी VIDEO

SCROLL FOR NEXT