Viral Video: रेल्वे ट्रॅकवर फसली 'थार'; नागालँडच्या राजधानीतला व्हिडिओ व्हायरल Watch

Nagaland Thar On Railway Track Video: नागालँडची राजधानी दिमापूर येथील रेल्वे स्थानकावरुन रेल्वे रुळांवर थार कार फसल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
Nagaland Thar Viral Video
Thar Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

नागालँड: येथून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. नागालँडची राजधानी दिमापूर येथील रेल्वे स्थानकाच्या रुळांवर थार फसली आहे. थार मालकाने कार थेट रेल्वेच्या रुळांवर घातल्याने कार तिथेच फसली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, नेटकरी संताप व्यक्त करत आहेत.

समोर आलेल्या व्हिडिओनुसार, काळ्या रंगाची थार दिमापूर रेल्वे स्थानकाच्या रुळांवर फसली आहे. स्थानकाच्या समोर आसलेल्या रुळांवर अडकून पडल्याने कार बाहेर काढण्यासाठी चालक कसरत करत असल्याचे दिसत आहे. रात्रीच्या सुमारास ही घटना घडली, स्थानकांवर अनेक बघ्यांनी गर्दी केल्याचे दिसत आहे.

Nagaland Thar Viral Video
थायलंड समजून गोव्यात येऊ नका! नाईटक्लब बंद करण्याची भाजप नेते सावियो रॉड्रिग्ज यांची मागणी

नेटकऱ्यांनी यावरुन चांगलाच संताप व्यक्त केला आहे. चालकाने अशाप्रकारचे कृत्य का केले? तसेच अशा कृत्यांचे परिणाम काय होतात? याची त्याला कल्पना नाही का? रेल्वे सेवेला यामुळे अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे, असे सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केले. या बेजबाबदार कृत्यासाठी संबंधित थार चालकावर कारवाई करण्याची मागणी नेटकऱ्यांनी केली.

Nagaland Thar Viral Video
ZP Election 2025: सावर्डेत मोहन, आतिष यांच्यात थेट लढत; आरजी, काँग्रेस रिंगणात, आमदार गणेश गावकर यांची प्रतिष्ठा पणाला

स्थानिक वर्तपत्रातील माहितीनुसार याप्रकरणी दिमापूर रेल्वे पोलिसांनी ६५ वर्षीय थार चालकाला अटक केली आहे. रेल्वेच्या अत्यावश्यक सेवेत अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चालकाला अटक करण्यात आली आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com