

Arjun Rampal dance video: आदित्य धर याचा 'धुरंधर' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. या चित्रपटातील 'फ्लिपराची' (FA9LA) हे गाणे आणि त्यातील अक्षय खन्नाची डान्स स्टेप सध्या सोशल मीडियावरील सर्वात मोठा ट्रेंड बनली आहे. सर्वसामान्य चाहत्यांनंतर आता चित्रपटातील त्याचा सहकलाकार अर्जुन रामपाल देखील या गाण्याच्या तालावर थिरकण्यापासून स्वतःला रोखू शकलेला नाही. एका क्लबमधील अर्जुन रामपालचा हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय
चित्रपटात क्रूर 'मेजर इक्बाल'ची भूमिका साकारणाऱ्या अर्जुन रामपालने एका क्लबमध्ये अक्षय खन्नाच्या पावलावर पाऊल ठेवत त्याच आयकॉनिक स्टेप्स केल्या. त्याचा हा बिनधास्त अंदाज पाहून तेथे उपस्थित असलेले लोक थक्क झाले.
अक्षय खन्नाने साकारलेल्या रेहमान डकैत या पात्राची जादू केवळ प्रेक्षकांवरच नाही, तर खुद्द सहकलाकारांवरही किती आहे, हे या व्हिडिओवरून स्पष्ट होतेय.
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाच्या भूमिकेची जेवढी चर्चा आहे, तितकेच कौतुक अर्जुन रामपालच्या 'मेजर इक्बाल' या पात्राचेही होत आहे. त्याची गंभीर आणि क्रूर भूमिका प्रेक्षकांना प्रचंड भावली आहे. मात्र, पडद्यावर गंभीर दिसणारा हा मेजर खऱ्या आयुष्यात अक्षयच्या गाण्यावर मनसोक्त नाचताना दिसल्याने चाहत्यांनी या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. "मेजर इक्बाल आणि रेहमान डकैतची ही जुगलबंदी खरी धुरंधर आहे," अशा प्रतिक्रिया चाहते देत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.