Odishas Kandhamal Police Station Dainik Gomantak
देश

Watch Video: गांजा तस्करीत पोलिसांच्या सहभागाचा आरोप; संतप्त जमावाने पेटवले पोलीस ठाणे

Odisha: ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात काही पोलीस अंमली पदार्थांच्या तस्करीत सामील असल्याचा आरोप करत काही स्थानिकांनी पोलीस ठाण्यात येऊन ते पेटवून दिले.

Ashutosh Masgaunde

Mob In Odisha Sets Police Station On For Alleged Involvement Of Policemen In Smuggling Ganja:

गांजाच्या तस्करीमध्ये पोलिसांचा सहभाग असल्याच्या आरोपावरून ओडिशातील कंधमाल जिल्ह्यात शनिवारी संतप्त जमावाने पोलिस स्टेशन पेटवून दिले.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की ही घटना फिरिंगिया पोलिस स्टेशनमध्ये घडली आणि या घटनेत काही पोलिस जखमी झाले.

अधिका-याने सांगितले की काही स्थानिक लोक पोलीस ठाण्यात आले आणि काही पोलीस अंमली पदार्थांच्या विक्रीत गुंतले असल्याचा आरोप करत ते पेटवून दिले.

दक्षिण परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक सत्यब्रत भोई म्हणाले की, आंदोलकांनी पोलिस ठाण्यात असलेले फर्निचर लूटत अनेक कागदपत्रे पेटवून दिली.

स्थानिकांनी फुलबनी-फिरिंगिया-बालीगुडा रस्ताही अनेक तास रोखून धरला आणि पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक आणि इतर काही पोलिसांवर "गांजा तस्करीत सहभाग" असल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली.

यावेळी दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, रस्ता अडवणाऱ्या आंदोलकांना समजावण्यासाठी गेलेल्या काही पोलिसांशीही जमावाने झटापट केली.

भोई म्हणाले, “आंदोलकांच्या गटाने फिरिंगिया पोलिस ठाण्यात घुसून फर्निचरची लूट केली आणि इमारतीला आग लावली. यादरम्यान काही पोलीस जखमी झाले.” ते म्हणाले की स्थानिक पोलीस स्टेशन प्रभारी आणि इतर दोन पोलीस कर्मचार्‍यांवर केलेल्या आरोपांची योग्य चौकशी केली जाईल.

भोई म्हणाले की, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या संख्येने पोलिस पाठवण्यात आले असून कंधमालचे पोलिस अधीक्षकही एका पथकासह फिरिंग्याकडे रवाना झाले आहेत.

ते म्हणाले, “फिरिंगिया पोलिस स्टेशनमधील या घटनेत काही गांजा तस्करांचा हात असल्याचा संशय आहे. परिस्थिती आता नियंत्रणात आहे.

गांजा तस्करीचे प्रकरण वरिष्ठ अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिल्याचा दावा आंदोलकांनी केला परंतु "कंबागुडा गावातील ग्रामस्थांनी पोलिस व्हॅनमध्ये गांजासह पकडल्यानंतरही एसएचओ आणि इतर दोन पोलिसांवर कारवाई झाली नाही".

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT