Justice Rohit Dev: कोर्ट सुरू असतानाच राजीनामा देणारे हाय कोर्टाचे न्यायाधीश, रोहित देव यांचे गोवा कनेक्शन माहित आहे का ?

Mumbai High Court: मुंबई हाय कोर्टाचे न्यायाधीश रोहित देव यांनी नुकतेच भर कोर्टात आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. विशेष म्हणजे त्यांनी ही घोषणा करताना कोर्टाचे कामकाज सुरू होते.
Justice Rohit Dev
Justice Rohit DevDainik Gomantak

Goa connection of Mumbai High Court Justice Rohit Dev:

मुंबई हाय कोर्टाचे न्यायाधीश रोहित देव यांनी शुक्रवारी कोर्टाचे कामकाज सुरू असतानाच राजीनाम देत असल्याची घोषणा केल्याने सर्वत्र उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

नागपूर खंडपीठाचे (Nagpur Bench) न्यायाधीश असलेले रोहित देव यांनी ही घोषणा केली त्यावेळी न्यायलयात संबंधीत कामांसाठी आलेले लोक आणि अनेक वकिल उपस्थितीत होते. यानंतर न्यायाधीश देव यांच्याकडे सुनावनीसाठी असलेले खटले पुढे ढकलण्यात आले.

न्यायाधीश देव यांचे गोवा कनेक्शन

न्यायाधीश रोहित बी देव हे मुंबई हाय कोर्टाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश आहेत .देव यांची जून 2017 मध्ये अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, जेव्हा ते महाराष्ट्राचे महाधिवक्ता होते.

एप्रिल 2019 मध्ये देव यांची कायम न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. 4 डिसेंबर 2025 रोजी ते निवृत्त होणार होते. अशा स्थितीत त्यांचा राजीनामा देण्याचा निर्णय आश्‍चर्यकारक वाटत आहे.

न्यायमूर्ती रोहित यांनी गोव्यातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपुरातूनच झाले. न्यायमूर्ती रोहित यांनी 1986 मध्ये प्रॅक्टिस सुरू केली.

2015 मध्ये त्यांची महाराष्ट्राचे सहयोगी महाधिवक्ता म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी माजी महाधिवक्ता सुनील मनोहर आणि श्रीहरी अने यांच्यासोबत काम केले.

Justice Rohit Dev
POCSO: "समाजाच्या भीतीपोटी महिला असे प्रकार लपवतात"; हाय कोर्टाची टिप्पणी

महत्त्वपूर्ण खटला

कोर्टरूममध्ये उपस्थित असलेल्या वकिलांच्या म्हणण्यानुसार, न्यायमूर्ती देव यांनी राजीनामा देण्याच्या निर्णयामागील कारण सांगितले नाही परंतु ते म्हणाले की ते "स्व-सन्मानाच्या विरोधात वागू शकत नाहीत".

न्यायमूर्ती देव यांनी 2022 मध्ये कथित माओवादी संबंध प्रकरणात दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जीएन साईबाबा (GN Saibaba) यांची निर्दोष मुक्तता केली होती. आणि UAPA कायद्यांतर्गत खटल्याची कार्यवाही चुकीची असल्याचे सांगून जन्मठेपेची शिक्षा बाजूला ठेवली होती.

मात्र, सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) या आदेशाला स्थगिती देत हाय कोर्टाच्या नागपूर खंडपीठाला नव्याने सुनावणी घेण्याचे आदेश दिले होते.

महाराष्ट्र सरकारच्या जीआर विरोधात निकाल

न्यायाधीश देव यांनी गेल्या आठवड्यात महाराष्ट्र सरकारच्या ३ जानेवारीच्या ठरावाच्या (जीआर) अंमलबजावणीला स्थगिती दिली होती.

ज्यामध्ये नागपूर-मुंबई समृद्धी द्रुतगती महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) बांधकामात किंवा अंमलबजावणीत सहभागी असलेल्या कंत्राटदारांकडून गौण खनिजांच्या बेकायदेशीर उत्खननाबद्दल महसूल विभागाने दंड ठोठावला होता. त्याच्याविरुद्ध सरकारने जीआर काढला होता.

Justice Rohit Dev
Manipur Violence: "कायदा व सुव्यवस्थेचे तर धिंडवडे निघालेत, पण पोलिसही..."; सीजेआय चंद्रचूड यांनी पोलिसांना फटकारले

कोर्टात काय घडले?

शुक्रवारी कोर्ट सुरू असताना न्यायाधीश रोहित देव अचानक उपस्थित असलेल्या वकिलांना म्हणाले, तुम्ही सतत मेहनत घेत रहा. मी अनेक वेळा तुमच्याशी कठोर वागलो आहे त्याल्याबद्दल माफी मागतो.

न्यायमूर्ती देव यांची जून 2017 मध्ये मुंबई हाय कोर्टाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि डिसेंबर 2025 मध्ये ते निवृत्त होणार होते.

रोहित देव यांनी हाय कोर्टाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी 2016 मध्ये महाराष्ट्र (Maharashtra) सरकारचे महाधिवक्ता म्हणूनही काम केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com