Ratan Ranjan Dainik Gomantak
देश

VIDEO: पांढरी साडी, हवाई चप्पल अन् हातात झालमुडी! भाजप कार्यालयाबाहेर ममता 'दीदीं'चा अवतार पाहून कार्यकर्ते अवाक; 'हम्बा-हम्बा'नं उडवली खळबळ

Ratan Ranjan Mamata Banerjee Mimicry: सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि मिमिक्री आर्टिस्ट रतन रंजन याने आपल्या अनोख्या अंदाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Manish Jadhav

Ratan Ranjan Mamata Banerjee Mimicry: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असतानाच, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि मिमिक्री आर्टिस्ट रतन रंजन याने आपल्या अनोख्या अंदाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पांढरी साडी, पायात हवाई चप्पल आणि हातात 'झालमुडी'ची प्लेट घेऊन रतन रंजन थेट भाजप मुख्यालयाबाहेर पोहोचला. हुबेहूब ममता बॅनर्जी यांची वेशभूषा आणि देहबोली साकारत त्याने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओने सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घातला.

या व्हायरल व्हिडिओमध्ये रतन रंजनने पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची हुबेहूब नक्कल केली. त्याची साडी नेसण्याची पद्धत, चालण्याची ढब आणि आत्मविश्वास पाहून अनेकजण पहिल्या नजरेत गोंधळून गेले की ही खरी 'दीदी' आहे की आणखी कोणी. हातात झालमुडीची प्लेट घेऊन तो भाजप कार्यालयाकडे जात असताना तिथे उपस्थित असलेले कार्यकर्ते आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी अवाक झाले. त्याचे अचूक टायमिंग आणि अभिनय पाहून लोकांनी त्याचे कौतुक केले, तर काहीजण हसताना आणि त्याचे व्हिडिओ बनवताना दिसले.

व्हिडिओमध्ये रतन रंजन ममता बॅनर्जींच्या शैलीत भाजप नेत्यांवर कडाडून टीका करताना दिसतो. "मोदीजी! रक्षा करो! उरी बाबा! हम्बा-हम्बा... तुम्ही बंगालमध्ये येऊन काय करत आहात? इकडे येऊन 'जय श्रीराम' म्हणत आहात, भगवा लावत आहात. हे आम्ही होऊ देणार नाही!" असे म्हणत तो उपरोधिक टोले लगावतो.

पुढे तो अमित शाहांचा उल्लेख करत म्हणतो की, "तुम्ही 'नॉटी बॉय' बनून बंगालमधील सर्व हिंदूंना 'जय श्रीराम' म्हणत एकत्र केले. आम्ही इकडे टीएमसीची भीती निर्माण करुन मते मिळवली आणि तुम्ही येऊन आमचा 'खेला' केला. आम्ही तुम्हाला सोडणार नाही!" इतकेच बोलून न थांबता तो थेट जमिनीवर बसून "मी खुर्ची सोडणार नाही, मी इथेच धरणे धरुन बसेन" असा पवित्रा घेतो आणि झालमुडी खाण्यास सुरुवात करतो.

कोण आहे रतन रंजन?

रतन रंजन हा एक लोकप्रिय सोशल मीडिया (Social Media) मिमिक्री आर्टिस्ट आहे. तो विविध नेते आणि सार्वजनिक व्यक्तींची नक्कल करुन व्हिडिओ बनवण्यासाठी ओळखला जातो. बंगाल निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या संभाव्य पराभवाच्या पार्श्वभूमीवर त्याने केलेला हा ममता बॅनर्जींचा गेटअप सध्या चर्चेचा विषय ठरला. नेटकऱ्यांनी या व्हिडिओला अतिशय सर्जनशील आणि मजेशीर असल्याचे म्हटले असून राजकारणाच्या गंभीर वातावरणात अशा प्रकारच्या कंटेंटमुळे थोडा हलकेपणा येत असल्याची प्रतिक्रिया दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dashank Yog 2026: नशिबाची तगडी लॉटरी, गरिबी कायमची मिटणार! 'दशांक योग' पालटणार 5 राशींचं भाग्य; बुध-मंगळाचा मोठा चमत्कार

Kharivada: खारीवाडा जेटीच्या दुरुस्तीचे आदेश; आमदार साळकर यांच्याकडून पाहणी; मासेमारी हंगामापूर्वी काम पूर्ण करण्याच्या सूचना

RBI Alert: 200, 500 रुपयांच्या नोटांबाबत आरबीआयकडून अलर्ट जारी, बाजारपेठेत नकली नोटांचा सुळसुळाट; वेळीच सावध व्हा!

Dharbandora Health Centre: कुळे-शिगावला मिळणार 24 तास सेवा; आपत्कालीन 'आरोग्य सेवा केंद्र' सुरू, सभापती गावकर यांच्या हस्ते उद्‌घाटन

India vs England 2nd T20: संजू सॅमसन अन्‌ तिलक वर्माची फलंदाजी रडारवर; वैभवला संधी मिळणार?

SCROLL FOR NEXT