Mamata Banerjee: राम, वाम आणि श्याम एकत्र आले… ममता बॅनर्जी पुन्हा बरसल्या

Mamata Banerjee Targets BJP Congress CPIM: ममता म्हणाल्या की, आम्ही आमच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली, पण भाजपने त्यांच्या कार्यकर्त्यांवर कोणतीही कारवाई केली नाही.
Mamata Banerjee
Mamata BanerjeeDainik Gomantak
Published on
Updated on

Mamata Banerjee Targets BJP Congress CPIM: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) प्रमुख ममता बॅनर्जी यांनी रविवारी भाजपवर जोरदार निशाणा साधला. उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी भाजपवर केला. ममता म्हणाल्या की, राम, वाम आणि श्याम यांनी हातमिळवणी केली आहे. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली, पण भाजपने त्यांच्या कार्यकर्त्यांवर कोणतीही कारवाई केली नाही.

ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या की, 'भाजप, डावे आणि काँग्रेस म्हणजेच राम, वाम आणि श्याम टीएमसीच्या विरोधात एकत्र आहेत.' त्या पुढे म्हणाल्या की, ''आम्ही नेहमी काही चूक झाली की कारवाई करतो, पण संदेशखळीमध्ये आधी ईडी, नंतर भाजप आणि आता मीडिया तेथील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहे. कोणावर आरोप असतील तर कारवाई करु. मी पोलिसांना स्वतःहून दखल घेण्यास सांगितले आहे.''

Mamata Banerjee
Mamata Banerjee: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कारला अपघात; डोक्याला दुखापत

'भाजप बंगाल विरोधी'

भाजपवर टीकास्त्र डागताना ममता म्हणाल्या की, 'आमच्या ब्लॉक प्रमुखाला अटक करण्यात आली आहे. भंगारमध्ये अरबूल इस्लामलाही अटक करण्यात आली आहे, मात्र भाजपने आपल्या नेत्यांवर काय कारवाई केली.'' भाजप बंगाल, महिला, शेतकरी, दलित आणि शेतकरी विरोधी असल्याचा आरोप त्यांनी केला.

'निवडणूक आयोग भाजपसाठी काम करत आहे'

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगावरही निशाणा साधला आणि भाजपसाठी काम करत असल्याचा आरोप केला. निवडणूक आयोग भाजपच्या आदेशानुसार काम करत असेल तर आम्हाला लढण्याचा आणि मत मांडण्याचा अधिकार आहे, हे लक्षात ठेवा. ते आम्हाला घाबरवण्यासाठी ईडी आणि सीबीआयचा वापर करत आहेत.

Mamata Banerjee
Mamata Banerjee: ममता बॅनर्जींवरील व्यंगचित्र फॉरवर्ड करणाऱ्या प्राध्यापकाची तब्बल 11 वर्षानंतर सुटका

'भाजप सर्वत्र अराजक माजवत आहे'

शेतकऱ्यांच्या आंदोलनावर ममता बॅनर्जी म्हणाल्या की, 'भाजप सर्वत्र अराजक माजवत आहे. ते एका समाजाला दुसऱ्या समाजाविरुद्ध भडकवत आहे.' ममता पुढे म्हणाल्या की, 'आम्ही शेतकऱ्यांना अन्नदाता म्हणतो, पण पंजाब, दिल्ली आणि हरियाणामध्ये त्यांना वाईट वागणूक दिली जात आहे. त्यांना दिल्लीत येण्यापासून रोखले जात आहे.''

'तुम्ही कोणालाही तुरुंगात टाकू शकत नाही'

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा संदर्भ देत ममता म्हणाल्या की, अशा प्रकरणांमध्ये कारवाई करण्याचा योग्य मार्ग आहे. तुमच्यावर कोणावर आरोप असेल तर आधी त्याची चौकशी करा आणि मगच आरोपपत्र दाखल करा. कायद्याला त्याचे काम करु द्या. तुम्ही कोणालाही तुरुंगात टाकू शकत नाही. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींनीही हेच केले, पण त्यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com