Weather Updates Dainik Gomantak
देश

महाराष्ट्रात लवकरच बरसणार सरी, दिल्लीचा वाढणार पारा

दिल्लीत पारा वाढेल पण उष्णतेपासून दिलासा मिळेल.

दैनिक गोमन्तक

दिल्लीसह उत्तर भारतातील बहुतांश भागात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेपासून दिलासा मिळालेला आहे. कमाल तापमान घसरले असून ते 40 अंश सेल्सिअसच्या खाली जाते आहे. तापमानात वाढ झाली असली तरी दिल्लीत उष्णतेपासून दिलासा मिळाला असून आजही तापमान 40 च्या खाली राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. उद्यापासून पारा वाढणार असला तरी पुढील आठवडाभर उष्णतेची लाट येण्याची शक्यता नाहीये. त्याचवेळी सहा दिवसांच्या मुक्कामानंतर दक्षिण-पश्चिम मान्सून श्रीलंकेत पोहोचला असून, तो आता केरळच्या दिशेने सरकत आहे. (Mercury to rise in Delhi UP Rainy weather in Kerala)

दिल्लीशिवाय उत्तर प्रदेशातही पारा घसरला आहे आणि इथेही बहुतांश शहरांमध्ये पारा 40 च्या खाली राहण्याची शक्यता वर्तवला आहे. प्रयागराजमध्येही कमाल तापमान 40 च्या खालीच म्हणजे 39 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राजस्थानातील उष्णतेपासून दिलासा मिळाला असून येथेही तापमान मंदावले आहे.

दिल्लीत येत्या 4-5 दिवसांत पारा 41 च्या पुढे जाईल

गुरुवारी राजधानीत स्वच्छ आकाश असताना दिल्लीचे कमाल तापमान किंचित वाढले, परंतु ते आरामदायकच राहिले. दिल्लीच्या बेस स्टेशन सफदरजंग वेधशाळेत कमाल तापमान 36.7 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे, जे वर्षाच्या या वेळेसाठी सामान्यपेक्षा चार अंशांनी कमी असल्याचे सांगितले जात आहे. एक दिवस आधी बुधवारी कमाल तापमान 34.4 अंश सेल्सिअस नोंदवले होते. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, किमान तापमान 22.5 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. येत्या चार ते पाच दिवसांत पारा 41 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता असली तरी पुढील आठवडाभर उष्णतेची लाट येण्याची शक्यता नसल्याचे सांगितले आहे.

महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे. अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस पडला आहे. मराठवाडा, विदर्भासह अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस राज्यात आणखी मुसळधार पाऊस पडू शकतो.

राज्याच्या हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, सांगली, कोल्हापूर, पालघर, धुळे, नंदुरबार, यवतमाळ, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.

मान्सून वेळेपूर्वी केरळमध्ये पोहोचू शकतो

दुसरीकडे सहा दिवस थांबल्यानंतर नैऋत्य मान्सून श्रीलंकेत पोहोचला असून तो आता केरळकडे सरकला. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) गुरुवारी सांगितले आहे की, “दक्षिण अरबी समुद्राच्या काही भागांमध्ये नैऋत्य मोसमी पावसाच्या पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल आहे. पुढील 48 तासांत ते लक्षद्वीपच्या लगतच्या भागांमध्ये मालदीवपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा वर्तवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT