Meghalaya Chief Minister Conrad Sangma Dainik Gomantak
देश

Meghalaya: तारीख ठरली! कॉनराड संगमा घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, PM मोदीही...

Meghalaya Chief Minister Conrad Sangma: मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी राज्यपालांना सरकार स्थापनेचे पत्र दिले आहे.

Manish Jadhav

Meghalaya Chief Minister Conrad Sangma: मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी राज्यपालांना सरकार स्थापनेचे पत्र दिले आहे. 7 मार्च रोजी सकाळी 11 वाजता राजभवनात शपथविधी सोहळा होणार आहे. शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान, गृहमंत्री आणि इतर नेते उपस्थित राहतील अशी शक्यता आहे.

तत्पूर्वी, माजी उपमुख्यमंत्री आणि नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) आमदार प्रेस्टोन टायन्सॉन्ग यांनी शनिवारी सांगितले की, मेघालयातील एनपीपीच्या नेतृत्वाखालील सरकारचा (Government) शपथविधी सोहळा 7 मार्च रोजी होणार आहे.

दरम्यान, नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) चे ज्येष्ठ आमदार टिमोथी डी शिरा यांनी शनिवारी मेघालय विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. रेसुबेलपाडा येथील आमदार शिरा यांचे राज्यपाल फागू चौहान यांनी राजभवनात निवर्तमान मुख्यमंत्री कॉनराड के. संगमा आणि एनपीपीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांना शपथ देण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा शपथविधीला उपस्थित राहणार आहेत

प्रेस्टन टायन्सॉन्ग यांनी सांगितले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) 7 मार्च रोजी होणाऱ्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहतील.

आसामचे मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वा सरमा, जे NEDA चे संयोजक देखील आहेत, शपथविधीला उपस्थित राहणार आहेत. आमच्याकडे सरकार स्थापनेसाठी पुरेशी संख्या आहे आणि आम्ही इतर राजकीय पक्षांशी देखील बोलत आहोत."

दुसरीकडे, कॉनराड संगमा यांनी शुक्रवारी 32 आमदारांच्या पाठिंब्याने राज्यात पुढील सरकार स्थापन करण्याचा दावा केला होता. यामध्ये NPP चे 26 आमदार, भारतीय जनता पार्टी (BJP) आणि हिल स्टेट पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (HSPDP) चे प्रत्येकी दोन आणि दोन अपक्षांचा समावेश आहे.

निवडणुकीनंतर हिंसाचाराच्या घटना समोर आल्या

राज्याच्या वेगवेगळ्या भागात मतदानानंतरच्या हिंसाचाराच्या काही घटनांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रेस्टन टायन्सॉन्ग म्हणाले होते की, "आम्ही कोणालाही कायदा आणि सुव्यवस्था भंग करु देणार नाही. काल रात्री काही हिंसक घटना घडल्या. मात्र, आम्ही तात्काळ राज्य पोलिसांना दोषींना अटक करण्यास सांगितले आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.''

याआधी, शुक्रवारी, मतमोजणीनंतर हिंसाचार झाल्याच्या वृत्तानंतर पश्चिम जयंतिया हिल्सच्या जिल्हा प्रशासनाने मेघालयातील सहस्नियांग गावात पुढील आदेशापर्यंत कर्फ्यू लागू केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dashank Yog 2026: नशिबाची तगडी लॉटरी, गरिबी कायमची मिटणार! 'दशांक योग' पालटणार 5 राशींचं भाग्य; बुध-मंगळाचा मोठा चमत्कार

Kharivada: खारीवाडा जेटीच्या दुरुस्तीचे आदेश; आमदार साळकर यांच्याकडून पाहणी; मासेमारी हंगामापूर्वी काम पूर्ण करण्याच्या सूचना

RBI Alert: 200, 500 रुपयांच्या नोटांबाबत आरबीआयकडून अलर्ट जारी, बाजारपेठेत नकली नोटांचा सुळसुळाट; वेळीच सावध व्हा!

Dharbandora Health Centre: कुळे-शिगावला मिळणार 24 तास सेवा; आपत्कालीन 'आरोग्य सेवा केंद्र' सुरू, सभापती गावकर यांच्या हस्ते उद्‌घाटन

India vs England 2nd T20: संजू सॅमसन अन्‌ तिलक वर्माची फलंदाजी रडारवर; वैभवला संधी मिळणार?

SCROLL FOR NEXT