PM Modi In Meghalaya: मोदी, तुमची कबर खोदली जाईल, या टीकेवर काय म्हणाले पंतप्रधान मोदी...

मेघालय विधानसभा निवडणुकीसाठी शिलाँगमध्ये सभा, विरोधकांवर हल्लाबोल
PM Narendra Modi
PM Narendra ModiDainik Gomantak
Published on
Updated on

PM Narendra Modi In Meghalaya: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेघालय विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचारार्थ शुक्रवारी (24 फेब्रुवारी) शिलाँगमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी पंतप्रधानांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशाने नाकारलेले, निराशेच्या गर्तेत बुडालेले काही लोक आजकाल हार घालतात आणि मोदी तुमची कबर खोदू, असे म्हणत आहेत, पण देशाच्या कानाकोपऱ्यातून मात्र मोदी तुमचे कमळ फुलणार, असा विचार येत आहे. विकृत विचारसरणी आणि चुकीची भाषा बोलणाऱ्यांना देशातील जनता चोख प्रत्युत्तर देईल.

PM Narendra Modi
Devisingh Shekhawat: माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या पतीचे निधन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेपूर्वी शिलाँगमध्ये रोड शोही केला. ते म्हणाले की जेव्हा मी मेघालयचा विचार करतो तेव्हा प्रतिभावान लोकांचा, चैतन्यशील परंपरांचा, अद्भुत नैसर्गिक सौंदर्याचा विचाय येतो.

मेघालयचे संगीत जिवंत आहे. येथे फुटबॉलची आवड आहे. मेघालयच्या प्रत्येक कोपऱ्यात सर्जनशीलता आहे. भारत यशाची नवीन शिखरे पादाक्रांत करत आहे आणि मेघालय यात भरीव योगदान देत आहे. ते पुढे घेऊन राज्यासाठी काम करायचे आहे.

PM Narendra Modi
Adani Group News: अदानी ग्रुपची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली; मीडियावर बंदी घालण्यास नकार

मोदी म्हणाले की, आज तुम्ही ज्या प्रकारे अप्रतिम रोड शो केलात त्यातून कळते की मेघालयचे लोक चॅम्पियन आहेत. तुमच्या प्रेमाचे आणि आशीर्वादाचे ऋण मी मेघालयाचा विकास करून, तुमच्या कल्याणकारी कार्याला गती देऊन फेडणार आहे.

तुझे हे प्रेम मी व्यर्थ जाऊ देणार नाही. मेघालयच्या लोकांना फॅमिली फर्स्ट ऐवजी पीपल फर्स्ट सरकार हवे आहे.

पीएम मोदी म्हणाले की, आज कमळाचे फूल मेघालयची शक्ती, शांतता आणि स्थिरतेचे प्रतीक बनले आहे. लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न झाला, आम्ही त्यांना एकत्र केले आहे. मेघालय आता 'लूक ईस्ट पॉलिसी'चा आधारस्तंभ बनत आहे.

मेघालयात भाजपचे सरकार आल्यास मला दिल्लीतून मेघालयातील जनतेची सेवा करण्याची संधी मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com