Meghalaya Election 2023: मेघालयाच्या निवडणुकीत गोव्यातील चर्चचा दाखला, भाजपा प्रदेशाध्यक्ष नेमकं काय म्हणाले?

मतदानापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष अर्नेस्ट अर्नेस्ट मावरी हे गोमांस खाल्लेल्या विधानावरून वादात सापडले आहेत.
Ernest Mawri
Ernest MawriDainik Gomantak
Published on
Updated on

Meghalaya Election 2023: मेघालय विधानसभा निवडणुकीसाठी 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. मतदानापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष अर्नेस्ट मावरी हे गोमांस खालेल्या विधानावरून वादात सापडले आहेत. दरम्यान, आता त्यांनी राज्यातील 'चर्च' बाबत वक्तव्य केले आहे.

मेघालय आणि गोव्यात एकही चर्च बंद करण्यात आलेले नाही, या दोन्ही ठिकाणी भाजपची सत्ता आहे. असे वक्तव्य अर्नेस्ट मावरी (Ernest Mawrie) यांनी केले आहे.

मेघालय भाजप प्रमुख म्हणाले, "देशात एनडीएचे राज्य आहे, मेघालयमध्ये किंवा गोव्यात एकही चर्च बंद केलेले नाही. काही लोक चर्च बंद केल्याबाबत खोटा प्रचार करत आहेत. यावेळी आम्ही सर्व 60 जागांवर निवडणूक लढवत आहोत आणि सरकार स्थापन करू"

भाजप कोणत्याही जात, पंथ, धर्माचा विचार करत नाही. तसेच, ते स्वतः बीफ खातात आणि पक्षाला यात कोणतीही अडचण नाही. असेही अर्नेस्ट मावरी यांनी खुलासा केला.

Ernest Mawri
Potekar Festival Goa 2023: पोतेकार! गोव्याचा अनोखा मिनी कार्निव्हल, दिवाडी बेटावर उत्साहाचे वातावरण

"भाजप कोणताही जात, पंथ, धर्माचा विचार करत नाही. आम्हाला जे पाहिजे ते खाऊ शकतो. ही आमची खाण्याची सवय आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला यात अडचण का असावी? मेघालयातील प्रत्येकजण गोमांस खातो आणि राज्यात कोणतीही बंदी नाही. ही आमची सवय आणि संस्कृती आहे," असे मेघालय भाजपचे प्रमुख मावरी म्हणाले.

"आगामी निवडणुकीत आम्ही किमान 34 जागा जिंकू आणि हा आमचा अंदाज आहे. आता ते आम्हाला मतदान करतात की नाही हे जनतेवर अवलंबून आहे. लोकांना राज्यात शांतता आणि विकास हवा असेल तर ते भाजपला राज्य करण्याची संधी नक्कीच दिली पाहिजे." असे भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

27 फेब्रुवारी रोजी विधानसभेच्या 60 जागांसाठी मतदान होणार आहे. निवडणुकीचा निकाल 2 मार्चला लागणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com