Weather Update Dainik Gomantak
देश

Weather: उत्तरेत उष्णतेची लाट; ईशान्येकडे पावसाचा जोर, भातपिकाचे नुकसान

Weather उत्तर भारतातील अनेक राज्यांना उष्णतेच्या लाटेचा जबर तडाखा बसला असताना दिल्लीमध्ये थंड वारे वाहू लागले.

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली: Weather Update उत्तर भारतातील अनेक राज्यांना उष्णतेच्या लाटेचा जबर तडाखा बसला असताना दिल्लीमध्ये शुक्रवारी थंड वारे वाहू लागल्याने स्थानिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. (Many states in northern India have been hit hard by the heat wave)

दुसरीकडे त्रिपुरामध्ये अचानक पूरस्थिती निर्माण झाल्याने दोन हजार लोकांना शिबिरांमध्ये हलविण्यात आले आहे. मागील 48 तासांमध्ये ईशान्येकडील राज्यांना अतिवृष्टीने अक्षरश ः झोडपून काढले असून रस्ते आणि ऊर्जा पुरवठा करणारी यंत्रणा आणि पिकांचेही यामुळे मोठे नुकसान झाले आहे. पंजाब आणि हरियानामध्ये 40 डिग्री सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली. राजस्थानातील चुरू येथील पारा 43.7 अंशांवर गेला होता, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले.

हरियानातील गुडगाव येथे 43.5 अंश एवढ्या तापमानाची नोंद झाली. हा भाग दिल्ली परिसरामध्ये येतो. आज दिल्लीवर काळे ढग दाटल्याने थंड वारे वाहू लागले होते, यामुळे उष्णतेमध्ये होरपळणाऱ्या राजधानीवासीयांना मोठा दिलासा मिळाला. दरम्यान हा दिलासाही फार काळ टिकण्याची शक्यता नाही. (Many states in northern India have been hit hard by the heat wave)

भातपिकाचे नुकसान

पश्‍चिम बंगाल, सिक्कीम, नागालँड, मिझोराम, त्रिपुरा या ईशान्येकडील राज्यांमध्ये अनेक ठिकाणांवर पाऊस पडला. या अतिवृष्टीमुळे भातपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

Riyadh Airport Missile Attack: मिसाइल कोसळताच उठला आगीचा मोठा लोळ, रियाद विमानतळावरील 'त्या' थरारक क्षणांचा हादरवणारा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT