Mani Shankar Aiyar's statement on Pakistan Dainik Gomantak
देश

Mani Shankar Aiyar: ‘’पाकिस्तानची इज्जत करा, त्याच्याकडे अणुबॉम्ब...’’; सॅम पित्रोदा यांच्यानंतर मणिशंकर अय्यर बरळले

Mani Shankar Aiyar's statement on Pakistan: अय्यर यांनी पाकिस्तानकडे असलेल्या अणुबॉम्बबाबत भारताला इशारा दिला.

Manish Jadhav

Mani Shankar Aiyar's statement on Pakistan: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे माजी अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी नुकतेच वादग्रस्त वक्तव्य करुन राजकीय राळ उडवली होती. यातच आता, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी वक्तव्य करुन राजकीय वादंग निर्माण केला आहे.

अय्यर यांनी पाकिस्तानकडे (Pakistan) असलेल्या अणुबॉम्बबाबत भारताला इशारा दिला. नुकताच अय्यर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ते दावा करत आहेत की, ‘’पाकिस्तानसोबतच्या समस्या संपवण्यासाठी भारताकडून प्रयत्न केले जात नाहीत. पाकिस्तानचा सन्मान केला तर तो बॉम्बचा विचार करणार नाही.’’अलीकडेच इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांनीही भारताला पाकिस्तानच्या अणुबॉम्बबाबत इशारा दिला होता. पाकिस्ताननेही 'बांगड्या घातल्या नाहीत' असे ते म्हणाले होते.

चिल पिल नावाच्या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अय्यर म्हणाले की, ‘पाकिस्तानचाही सन्मान केला पाहिजे. त्याच्याशी चर्चा व्हायला हवी. पाकिस्तान हा सार्वभौम देश आहे.’

अय्यर म्हणाले की, ‘’अणुबॉम्बची रेडिओ ॲक्टिव्हिटी काही क्षणात अमृतसरला पोहोचेल. ते पुढे म्हणाले, 'असे करुन काहीही साध्य होणार नाही त्याने फक्त तणाव वाढेल. एवढेच नाही तर पाकिस्तानची सत्ता अशा कोणत्याही पागल व्यक्तीच्या हातात गेली तर तुम्हीच विचार करा काय होईल? पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे. आपल्याकडेही अणुबॉम्ब आहे.’’

दरम्यान, अय्यर यांनी केंद्र सरकार पाकिस्तानसोबतचे प्रश्न सोडवत नसल्याचा आरोपही केला. ते म्हणाले की, ‘’आपल्याला हे समजले पाहिजे की, आपल्याला ग्लोबल लीडर बनायचे असेल, तर पाकिस्तानशी आपल्या ज्या काही समस्या आहेत त्यावर तोडगा काढला पाहिजे.’’

अय्यर यांच्या मुद्द्यावर भाजपने काँग्रेसला कोंडीत पकडले

अय्यर यांच्या या वक्तव्याचा केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी चांगलाच समाचार घेतला. चंद्रेशखर म्हणाले की, ‘’राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या काँग्रेसची विचारधारा या निवडणुकांमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. सियाचीनवरील दावा सोडण्यासह पाकिस्तानचा पाठिंबा घेणे. यासिन मलिक सारख्या लोकांचा आणि दहशतवादाशी संबंधित संघटनांचा पाठिंबा. गरीब जनतेच्या पैशाची लूट आणि भ्रष्टाचार. सॅम पित्रोदा यांची समाजात फूट पाडणारी चर्चा. अनेक दशके प्रगती न करु शकलेल्या एससी, ओबीसी, एसटी या सर्व लोकांच्या खर्चावर मुस्लिम समाजाचे तुष्टीकरण, सामंजस्य करार आणि चीनच्या कम्युनिस्ट पक्षाशी युती...’’ भाजप नेत्याने अय्यर यांचा व्हिडिओही शेअर केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Duleep Trophy 2025 Final: 11 वर्षांनंतर सेंट्रल झोनच्या झोळीत दुलीप ट्रॉफी, अंतिम सामन्यात दक्षिण विभागाचा 6 विकेट्सने पराभव

"99 प्रॉब्लेम्स आहेत, पण नवऱ्याची कटकट नाही", दक्षिणी अभिनेत्रीचे डिवोर्स फोटोशूट; नेटकरी थक्क

Viral Video: 1997 साली जमिनीखाली गाडलं गेलेलं जलजीराचे पॅकेट 27 वर्षानंतर जसंच्या तसं सापडलं, नेटकरी म्हणाले, 'Don't Use Plastic'

Curchorem: ...तर पालिकेसमोरच मासळी विक्री करू! कुडचडेतील पारंपरिक विक्रेत्‍यांचा इशारा; बेकायदेशीर विक्रीमुळे असंतोष

Asia Cup 2025 Points Table: पाकिस्तानवर मात करूनही Team Indiaचं नुकसान, पॉइंट्स टेबलमध्ये झाली घसरण

SCROLL FOR NEXT