Mamata Banerjee not happy with congress, TMC will absent for opposition meeting  Dainik Gomantak
देश

'जेंव्हा आम्ही लढलो तेंव्हा कुठं होता' ममतांचा काँग्रेसला झटका

टीएमसीचे ज्येष्ठ नेते म्हणाले की, काँग्रेस अडचणीत आहे. मेघालयात पक्षाची विभागणी झाली आहे. गोव्यात त्यांचे चार आमदार शिल्लक आहेत. पंजाब, मध्य प्रदेशातील हायप्रोफाईल नेत्यांमध्ये मतभेद आहेत.

दैनिक गोमन्तक

राष्ट्रीय स्तरावर स्वत:ला प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तृणमूल काँग्रेसने(Trinamool Congress) शनिवारी संसदेत (Parliament) काँग्रेससोबत (Congress) जाणार नसल्याचे संकेत दिले आहेत. TMC सोमवारी होत असलेल्या राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांच्या बैठकीला देखील उपस्थित राहणार नसल्याची माहिती माहिती समोर अली आहे . म्हणजेच तृणमूल काँग्रेसच्या विस्तारात काँग्रेसला पसंती नाही हे दिसून येत आहे(Mamata Banerjee). टीएमसीच्या सूत्रांनी सांगितले की, काँग्रेस अनेक राज्यांमध्ये विभाजन आणि अंतर्गत कलहाचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत ते संसदेत विरोधकांच्या प्रयत्नांचे नेतृत्व आणि समन्वय करण्याच्या स्थितीत नाहीत. टीएमसीने म्हटले आहे की DMK, RJD, डावे पक्ष, JMM आणि अगदी शिवसेना या मित्रपक्षांव्यतिरिक्त TMC शी आपले संबंध पाहिले पाहिजेत, ज्यांच्यासोबत महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता आहे.(Mamata Banerjee not happy with congress, TMC will absent for opposition meeting)

टीएमसीचे ज्येष्ठ नेते म्हणाले की, काँग्रेस अडचणीत आहे. मेघालयात पक्षाची विभागणी झाली आहे. गोव्यात त्यांचे चार आमदार शिल्लक आहेत. पंजाब, मध्य प्रदेशातील हायप्रोफाईल नेत्यांमध्ये मतभेद आहेत.असे सांगतच ज्या पक्षाची अशी स्थिती आहे, ते आमच्याशी काय चर्चा करणार आहेत? ते काय समन्वय साधणार आहेत? असा सवाल तयांनी केला आहे. विरोधी ऐक्याबद्दल विचारले असता, टीएमसीच्या आणखी एका नेत्याने सांगितले की, "5-6 महिन्यांपूर्वी जेव्हा विरोधकांनी आमच्याविरुद्ध डाव्यांशी लढा दिला तेव्हा त्यांची एकजूट कुठे होती. आम्ही भाजपविरुद्ध आमची सर्वात मोठी लढाई लढत असताना ते कुठे होते?

सोमवारी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी बोलावलेली बैठकीला टीएमसीच्या आवाहनावर काँग्रेसने तात्काळ प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. राज्यसभेतील टीएमसी नेते डेरेक ओब्रायन म्हणाले, "या अधिवेशनातील मुद्दे स्वत: निवडक आहेत. कृषीविषयक तीन कायदे रद्द करा, ईडी आणि सीबीआयच्या संचालकांचा कार्यकाळ असो, या मुद्द्यांवर सर्वजनिक चर्चा गरजेची असल्याचे सांगितले आहे.

तर दुसरीकडे शुक्रवारी, काँग्रेसने सांगितले की तो विरोधी पक्षाचा मध्यस्तंभ आहे आणि मुख्य विरोधी पक्ष म्हणून नेहमीच आपली जबाबदारी पार पाडत आहे. पत्रकार परिषदेला संबोधित करताना, राज्यसभेतील काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा म्हणाले, "आम्हाला गेल्या सात वर्षात प्रशासन आणि आता विरोधी पक्षात दोन्हीचा दीर्घ अनुभव आहे.आमचे एक घटनात्मक कर्तव्य आहे, जे आम्ही मानतो, या देशाचा प्रमुख विरोधी पक्ष म्हणून आम्ही त्याची जाणीव ठेवतो. आमच्या नागरिकांचे प्रश्न आम्ही मांडू असे मत काँग्रेस नेत्यांनी मांडले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

Navpancham Yog 2025: डिसेंबर महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांचे होणार बल्ले-बल्ले, नवपंचम योग ठरणार वरदान; धनलाभासह करिअरमध्ये सकारात्मक बदलाची चिन्हे!

Goa Politics: 'नोकरी घोटाळ्यातील एजंट भाजपचे', विजय सरदेसाईंचा मोठा गौप्यस्फोट; ढवळीकरांविरोधात षड्यंत्राचा आरोप

SCROLL FOR NEXT