S Jaishankar Dainik Gomantak
देश

''दहशतवाद्यांना मारण्यासाठी कोणताही नियम नाही, संधी मिळेल तिथे...''; परराष्ट्र जयशंकर स्पष्टच बोलले

S Jaishankar: भारत मागील अनेक दशकांपासून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा सामना करत आहे. देशात अनेक मोठे हल्ले दहशतवादी संघटनांनी घडवून आणले.

Manish Jadhav

S Jaishankar: भारत मागील अनेक दशकांपासून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा सामना करत आहे. देशात अनेक मोठे हल्ले दहशतवादी संघटनांनी घडवून आणले. पण आता दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी भारताकडून सातत्याने कठोर पाऊले उचलली जात आहेत. दहशवाद्यांचे आश्रयस्थान असलेल्या पाकिस्तानशी सध्या भारताचे कोणत्याही प्रकारचे संबंध नाहीत. भारताची भूमिका राहिली आहे की, जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद्यांच्या बाबतीत ठोस पाऊले उचलत नाही तोपर्यंत त्याच्याशी कोणत्याही प्रकारचा वार्तालाप सुरु केला जाणार नाही. अशातच, दहशतवादाच्या मुद्द्यावर बोलताना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, ''दहशतवाद्यांनी यापुढे या गैरसमजात राहू नये की ते सीमेच्या पलीकडे असल्याने त्यांना कोणी हात लावू शकत नाही. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत कोणतेही नियम नसतात.'' याशिवाय 2014 पासून भारताच्या परराष्ट्र धोरणात बदल झाला असून दहशतवादाशी सामना करण्याचा हा मार्ग असल्याचेही त्यांनी सांगितले.

परराष्ट्र मंत्र्यांना विचारण्यात आले की, असे कोणते देश आहेत ज्यांच्याशी भारताला संबंध राखणे कठीण जाते, तेव्हा त्यांनी पाकिस्तानचे नाव न घेता बोट दाखवले. दहशतवादी कोणत्याही नियमांचे पालन करत नाहीत. दहशतवाद्याला प्रत्युत्तर देण्यासाठी कोणतेही नियम असू शकत नाहीत," असे त्यांनी शुक्रवारी संध्याकाळी पुण्यात "व्हाय इंडिया मॅटर्स" या पुस्तकाच्या सत्रादरम्यान बोलताना सांगितले.

दरम्यान, 1947 मध्ये पाकिस्तानने जेव्हा कबायलींना काश्मीरमध्ये पाठवले तेव्हा भारतीय लष्कराने जशाच तसे उत्तर दिले. देश एकसंध झाल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना नमूद केले. परराष्ट्र मंत्री पुढे म्हणाले की, “जेव्हा भारतीय लष्कर आपली कारवाई करत होते, तेव्हा आम्ही थांबलो आणि संयुक्त राष्ट्रात गेलो. आम्ही दहशतवादापेक्षा कबायली आक्रमकांच्या कृत्यांचा संदर्भ दिला. पाकिस्तान दहशतवाद पसरवत असल्याची आमची भूमिका सुरुवातीपासूनच स्पष्ट असती, तर आमचे धोरण पूर्णपणे वेगळे असते.''

चीन सीमेवरील पायाभूत सुविधांसाठी सरकारने बजेट वाढवले ​​

1962 च्या युद्धानंतरही 2014 पर्यंत चीन सीमेवर पायाभूत सुविधांच्या विकासात कोणतीही प्रगती झाली नसल्याचा दावा परराष्ट्र मंत्र्यांनी केला. ते म्हणाले की, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून चीनच्या सीमेवरील पायाभूत सुविधांच्या बजेटमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. जयशंकर पुढे म्हणाले की, ''भारताने 1962 च्या युद्धातून धडा शिकायला हवा होता, परंतु सीमेवरील पायाभूत सुविधा विकसित करण्यात कोणतीही प्रगती झाली नाही.'' ते पुढे असेही म्हणाले की, ''मोदी सरकारने यासाठीचे बजेट 3,500 कोटी रुपयांवरुन 14,500 कोटी रुपये केले आहे.'' जयशंकर 'व्हाय इंडिया मॅटर्स: ऑपॉर्च्युनिटीज फॉर युथ अँड पार्टिसिपेशन इन द ग्लोबल परिदृश्य' या कार्यक्रमात तरुणांना संबोधित करत होते.

परराष्ट्र मंत्री पुढे म्हणाले की, ''भारताचे चीनसोबत 'वास्तववादी, जमिनीवर आधारित आणि व्यावहारिक धोरण' असले पाहिजे. चीन हा आपला शेजारी आहे आणि चीन असो वा इतर कोणताही शेजारी असो, सीमेवर तोडगा काढणे हे एक प्रकारचे आव्हान आहे. मला इथे इतिहासाकडे लक्ष वेधायचे आहे. जर आपण इतिहासातून धडा घेतला नाहीत तर आपण पुन्हा चुका करत राहू.''

सरदार पटेलांनी नेहरुंना पत्र लिहून चिंता व्यक्त केली होती

जयशंकर पुढे म्हणाले की, ''चीनने 1950 मध्ये तिबेटवर कब्जा केला होता आणि तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांना पत्र लिहून भारताच्या चीनबाबतच्या धोरणावर नाराज असल्याचे सांगितले होते.'' भारताने चीनच्या आश्वासनांवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नये, असा इशारा पटेल यांनी दिला होता, असा दावा त्यांनी केला. पण नेहरुंनी त्यांच्या चिंतेकडे दुर्लक्ष केले आणि सांगितले की चिनी लोक आशियाई लोक होते आणि त्यांच्या मनात भारताविषयी कोणत्याही प्रकारची अढी नव्हती. जयशंकर म्हणाले की, 'पटेल हे व्यावहारिक, डाउन टू अर्थ आणि वास्तववादी व्यक्ती होते.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranbir Kapoor: राज कपूर फिल्म फेस्टिव्हलची घोषणा! IFFI 2024 मध्ये रणबीरने केलं जाहीर

Goa Fraud: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने 100 कोटी लाटले, आरोपी लंडनला फरार; पोलिसांची शोध मोहीम सुरु!

Kulem Gram Sabha: कुळे ग्रामसभा तापली! ऑडिट रिपोर्टवरुन ग्रामस्थांनी सरपंचांना घेरले; मार्केट कॉमप्लेक्सच्या मुद्यावरुन वादंग

Goa News: कोट्यवधींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश, मुख्यमंत्र्यांनी दिले तात्काळ कारवाईची आदेश; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Anjuna News: गोव्यात संगीत महोत्सवाचा वाद चिघळला, भर सभेत तरुणाला मारहाण; Video Viral

SCROLL FOR NEXT