S jaishankar: 'मानवतावादी कायद्यांचे पालन करणे इस्रायलची जबाबदारी', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे वक्तव्य

Israel-Hamas War: इस्रायल-हमास संघर्षादरम्यान परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी गाझामधील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
S. Jaishankar
S. JaishankarDainik Gomantak
Published on
Updated on

Israel-Hamas War: इस्रायल-हमास संघर्षादरम्यान परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी गाझामधील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. मानवतावादी कायद्यांचे पालन करणे ही इस्रायलची आंतरराष्ट्रीय जबाबदारी आहे आणि लोकांच्या हत्येबाबत त्यांनी जागरुक असायला हवे होते, असे त्यांनी इस्रायलबद्दल पहिल्यांदाच म्हटले आहे. भारताने या मुद्द्यावर मानवाधिकारांशी संबंधित आपली भूमिका स्पष्ट केली, परंतु परराष्ट्रमंत्र्यांनी इस्रायलबाबत अशी टिप्पणी करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी जे. ब्लिंकन आणि जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री ॲनालेना बेरबॉक यांच्या उपस्थितीत जर्मनीतील म्युनिक सुरक्षा परिषदेत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सहभागी झाले. यावेळी त्यांनी 7 ऑक्टोबर रोजी इस्रायली भूभागावर हमासने केलेला हल्ला हा 'दहशतवादी हल्ला' असल्याचे म्हटले.

S. Jaishankar
Israel-Hamas War: कतारची मध्यस्थी फेल! इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धविराम होऊ शकला नाही...

काय म्हणाले परराष्ट्र मंत्री?

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी 7 ऑक्टोबर रोजी इस्रायली शहरांवर हमासने केलेल्या हल्ल्यांचे वर्णन दहशतवाद म्हणून केले. त्याचबरोबर त्यांनी इस्रायलचा देखील स्पष्टपणे उल्लेख केला. मानवतावादी कायद्यांचे पालन करण्यास इस्रायल बांधील असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. जयशंकर म्हणाले की, नागरिकांच्या हत्येबाबत इस्रायलनेही जागरुक असायला हवे होते.

ते पुढे म्हणाले की, “पहिला मुद्दा हा आहे की, 7 ऑक्टोबरला हमासने जो हल्ला केला तो दहशतवादी हल्ला होता. यात कोणतीही शंका नाही. दुसरा मुद्दा असा आहे की, प्रत्युत्तरादाखल इस्त्रायलने केलेल्या कारवाईत नागरिकांच्या जीवितहानीबद्दल सावधगिरी बाळगणे आवश्यक होते. परराष्ट्र मंत्र्यांनी पुढे सांगितले की, इस्रायली ओलीसांची सुटका करण्यात यावी. त्याचबरोबर गाझामध्ये मानवतावादी मदतही पोहचवण्यात यावी.

S. Jaishankar
Israel-Hamas War: 7 ऑक्टोबरचा कट रचणाऱ्या हमास कमांडरचा इस्रायलकडून व्हिडिओ शेअर; ''त्याला जिवंत किंवा मृत पकडल्याशिवाय...''

परराष्ट्र मंत्र्यांनी पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावर भारताच्या दीर्घकालीन भूमिकेवरही प्रकाश टाकला. ते म्हणाले की, “नक्कीच भारताचा दीर्घकाळापासून द्विराष्ट्रीय समाधानावर विश्वास आहे. भारताने अनेक दशके ही भूमिका कायम ठेवली आहे. त्याचबरोबर मला वाटते की, आज जगातील अनेक देशांना हे समजले आहे की द्विराष्ट्रीय समाधान केवळ आवश्यक नाही तर ते पूर्वीपेक्षा अधिक निकडीचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com