Mahua Moitra and Asaduddin Owaisi  Dainik Gomantak
देश

'भाज्या हिंदू अन् बकरी मुस्लिम झाली' म्हणत महुआ अन् ओवेसींचा जुबेरला पाठिंबा

भाजपचा द्वेष, कट्टरता आणि खोटेपणा उघड करणाऱ्या प्रत्येकाला धोका आहे- राहूल गांधी

दैनिक गोमन्तक

एका विशिष्ट धर्माच्या भावना भडकावल्याबद्दल दिल्ली पोलिसांनी सोमवारी अटक केलेल्या Alt न्यूजचे प्रमुख मोहम्मद जुबेर यांच्या समर्थनार्थ अनेक विरोधी नेत्यांनी विधाने केली आहेत. TMC खासदार महुआ मोईत्रा आणि AIMIM खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही अटकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. मोइत्रा यांनी जुबेरचे वर्णन फॅक्टर चेकर असे केले आहे. (Mohammed Zubair Arrested)

जुबेर सध्या दिल्ली पोलिसांच्या कोठडीत आहे. त्याला आज पुन्हा न्यायालयात हजर केले जाऊ शकते. काँग्रेस नेते राहुल गांधी, सपा नेते अखिलेश यादव यांच्यासह अनेक नेत्यांनी यापूर्वीच जुबेरच्या अटकेबाबत वक्तव्ये केली आहेत.

आता टीएमसी खासदार मोईत्रा यांनी ट्विट केले की, 'जुबेर सत्य बाहेर काढणारा एक फॅक्ट चेकर आहे. तो नेता किंवा उपदेशक नाही. तरीही त्यांच्या बचावासाठी केवळ विरोधी पक्षनेतेच का पुढे आले? 'बघा द्वेषाच्या युद्धात काय गमावले, भाजी हिंदू झाली, बकरी मुस्लिम झाली.'

ओवेसींनी दिल्ली पोलिसांवर निशाणा साधला

दुसरीकडे AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही झुबेरच्या अटकेचा निषेध केला आहे. "जुबेरला कोणतीही सूचना न देता अज्ञात एफआयआरमध्ये अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिस मुस्लीम नरसंहारविरोधी घोषणा देणाऱ्यांवर कोणतीही कारवाई करत नाहीत, तर गुन्हे नोंदवणाऱ्यांवर आणि खोटी माहिती देणाऱ्यांचा सामना करणाऱ्यांवर कारवाई करतात."

हजारो आवाज उठतील

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून याचा निषेध केला होता. ते म्हणाले होते, 'भाजपचा द्वेष, कट्टरता आणि खोटेपणा उघड करणाऱ्या प्रत्येकाला धोका आहे. सत्याच्या एका आवाजाला अटक केल्यास आणखी हजारो आवाज उठतील. सत्याचा नेहमी स्वैराचारावर विजय होतो.'

अखिलेशचा टोमणा - 'त्याला सत्य आवडलेलं दिसत नाही,'

यूपीचे माजी मुख्यमंत्री आणि सपा नेते अखिलेश यादव यांनीही जुबेरच्या अटकेचा निषेध केला. त्यांनी तर ट्विटरवर एक शेरच शेअर केला, "अच्छे नहीं लगते हैं उन झूठ के सौदागरों को सच की पड़ताल करने वाले… जिन्होंने अपनी आस्तीन में हैं पाले, नफरत का जहर उगलने"

तपासात सहकार्य करत नव्हते

गेल्या आठवड्यात दिल्ली पोलिसांनी जुबेरविरोधात गुन्हा दाखल केला होता. स्पेशल सेलच्या पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जून महिन्यात ट्विटर हँडलवरून तक्रार मिळाल्यानंतर मोहम्मद जुबेरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मोहम्मद जुबेरने जाणूनबुजून विशिष्ट धर्माच्या देवाचा अपमान करण्याच्या उद्देशाने आक्षेपार्ह छायाचित्र पोस्ट केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यांचे ट्विट रिट्विट केले जात होते. त्यांचे फॉलोअर्स आणि सोशल मीडिया संस्थांनी या ट्विटचा मोठ्या प्रमाणात प्रसार करण्यास सुरुवात केली.

दरम्यान सोमवारी मोहम्मद जुबेरला द्वारका येथील आयएफएससी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांचे ट्विट आक्षेपार्ह असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. आरोपींविरुद्ध IPC कलम 153 आणि कलम 295 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी चौकशीत सहकार्य करत नाही किंवा मोबाईल आणि लॅपटॉप देत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मोबाईल आणि लॅपटॉप तपासल्यानंतर आरोपीने हे वादग्रस्त ट्विट कधी केले आणि आतापर्यंत किती ट्विट केले याची माहिती मिळवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT