ऑल्ट न्यूजचे सह-संस्थापक मुहम्मद जुबेर यांना दिल्ली पोलिसांकडून अटक

ऑल्ट न्यूजचे सह-संस्थापक मुहम्मद जुबेर यांना दिल्ली पोलिसांनी 27 जून रोजी अटक केली आहे.
Muhammad Zubair, Co-Founder Of Alt News
Muhammad Zubair, Co-Founder Of Alt NewsDainik Gomantak
Published on
Updated on

ऑल्ट न्यूजचे सह-संस्थापक मुहम्मद जुबेर (Muhammad Zubair) यांना दिल्ली पोलिसांनी 27 जून रोजी अटक केली आहे. ज्यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे.

वृत्तानुसार, सायबर गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणे हाताळणाऱ्या दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) IFSO (इंटेलिजन्स फ्यूजन आणि स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स) विशेष सेलकडून झुबेर यांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, भारतीय दंड संहिता (IPC) कलम 153 (दंगल घडवण्याच्या हेतूने चिथावणी देणे) आणि 295 (जाणूनबुजून आणि दुर्भावनापूर्ण कृत्ये, कोणत्याही वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रद्धांचा अपमान करुन धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने) ही अटक करण्यात आली आहे. एएनआय एजन्सीने वृत्त दिले आहे.

तसेच, Alt News चे अन्य सह-संस्थापक प्रतीक सिन्हा यांनी झुबेर यांच्या अटकेची पुष्टी करण्यासाठी एक निवेदन जारी केले आहे.

दुसरीकडे, सिन्हा यांनी दावा केला की, झुबेर यांना 2020 च्या एका खटल्याच्या संदर्भात समन्स बजावण्यात आले होते, ज्यासाठी त्यांना आधीच दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) अटकेपासून संरक्षण दिले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com