3400 Lipstick Kisses  Dainik Gomantak
देश

कारवर 3400 Kiss अन् VIDEO व्हायरल! गर्लफ्रेंडचा 'किसिंग स्टंट' पठ्ठ्याला पडला महागात; पोलिसांनी कार धुवायला लावून ठोठावला 5500 रुपयांचा दंड

3400 Lipstick Kisses On Car Viral Video MP: मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे सोशल मीडियावर रील बनवून व्हायरल होण्याचा प्रयत्न एका तरुणाच्या चांगलाच अंगलट आला.

Manish Jadhav

3400 Lipstick Kisses On Car Viral Video MP: मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे सोशल मीडियावर रील बनवून व्हायरल होण्याचा प्रयत्न एका तरुणाच्या चांगलाच अंगलट आला. इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवण्यासाठी या पठ्ठ्याने आपल्या कारवर तब्बल 3400 वेळा किस करुन घेतल्याचा व्हिडिओ तयार केला होता. मात्र या अनोख्या आणि धक्कादायक प्रयोगामुळे तरुणाची चांगलीच पंचाईत झाली. या व्हिडिओने सोशल मीडियावर एकाच दिवसात तब्बल 55 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळवत खळबळ उडवून दिली खरी, पण त्यानंतर पोलिसांनी पठ्ठ्याची जिरवली.

व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर ग्वाल्हेरच्या वाहतूक पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चालकाला कारसह ताब्यात घेवून 5500 रुपयांचा ऑन-द-स्पॉट दंड ठोठावला.

हे संपूर्ण प्रकरण ग्वाल्हेर येथील आदित्य सिकरवार या तरुणाशी संबंधित आहे. सोशल मीडियावर स्वतःचे फॉलोअर्स वाढवण्यासाठी त्याने एक अजब प्लान आखला होता. त्याने आपल्या मैत्रिणीच्या मदतीने सुमारे चार तास मेहनत घेऊन कारच्या प्रत्येक भागावर किस करुन घेतले. त्यानंतर हा तरुण ती कार अत्यंत वेगाने रस्त्यावर पळवत रील शूट करत होता. व्हिडिओमध्ये कारचा नोंदणी क्रमांक स्पष्ट दिसत होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ग्वाल्हेर वाहतूक पोलिसांचे यावर लक्ष गेले.

पोलिसांनी (Police) व्हिडिओतील गाडीच्या क्रमांकावरुन वाहनाचा शोध घेतला आणि थाटीपूर परिसरातून आदित्य सिकरवारला कारसह ताब्यात घेतले. भरधाव वेगाने गाडी चालवणे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मोटार वाहन कायद्यानुसार 5500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. पोलिसांची कारवाई इथेच थांबली नाही. वाहतूक पोलिसांनी तरुणाच्या हातात कापड आणि पाण्याची बादली देऊन संपूर्ण कारवरील लिपस्टिकचे डाग स्वच्छ करायला लावले. कारवरील डाग पुसताना तरुणाची चांगलीच दमछाक झाली.

वाहतूक पोलीस ठाण्याचे प्रभारी अभिषेक रघुवंशी यांनी स्पष्ट केले की, केवळ सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी किंवा प्रसिद्धी मिळवण्यासाठी वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणे आणि स्वतःसह इतरांचा जीव धोक्यात घालणे अजिबात सहन केले जाणार नाही. अशा प्रकारची धोकादायक कृत्य करणाऱ्यांवर अधिक कडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT