Ferrari  Dainik Gomantak
देश

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Supercar Ferrari Seized: देशातील सर्वाधिक रोड टॅक्स कर्नाटकमध्ये घेतला जातो. मालकाने कर न भरल्यास तसेच, कागदपत्रे सादर न केल्यास फेरारी अधिकृतपणे जप्त केली जाईल, असे वाहतूक विभागाने स्पष्ट केले.

Pramod Yadav

बंगळुरु: महाराष्ट्रात नोंदणी असलेली तब्बल साडे सात कोटी रुपयांची फेरारी सुपरकार कर्नाटकमध्ये चालवली म्हणून रस्ते बंगळुरु वाहतूक विभागाने ताब्यात घेतली. महाराष्ट्र नोंदणीकृत ही सुपरकार त्याचा मालक बंगळुरु येथे चालवत असल्याचे आढळून आल्यानंतर बंगळुरु आरटीओने ही कारवाई केली.

फेरारीच्या मालकाने सुपरकारसाठी वीस लाख रुपयांचा रोड टॅक्स (रस्ते कर) भरला होता. कर्नाटकसाठी तो १.४ कोटी रुपये एवढा कर भरावा लागतो. करातील फरक निदर्शनास आल्यानंतर वाहतूक विभागाने ही कारवाई केली.

गुरुवारी सकाळी लालबाग येथे वाहतूक बंगळुरु विभागाने चौकशीअंती फेरारी ताब्यात घेऊन मालकाच्या घराखालीच पार्क केली. दरम्यान, त्यावर वाहतूक विभागाच्या वतीने लक्ष ठेवण्यात आले होते.

वाहतूक विभागाने मालकाला अधिकृत कागदपत्रे सादर करुन उरलेला कर भरण्याची सुचना केली आहे. मालकाने कर न भरल्यास तसेच, कागदपत्रे सादर न केल्यास फेरारी अधिकृतपणे जप्त केली जाईल, असे वाहतूक विभागाने स्पष्ट केले. दरम्यान, मालकाने एक कोटी ४१ लाख ५९ हजार ०४१ रुपये कर भरुन गाडी सोडवली असल्याचे देखील सांगितले आहे.

देशातील सर्वाधिक रोड टॅक्स कर्नाटकमध्ये घेतला जातो. भारतात रस्ते कर मोजण्यासाठी आसन क्षमता, इंजिनची सीसी, इंधनाचा प्रकार, किंमत, वजन, वापर (उपयोग) आणि वाहनाचे वय या सर्व गोष्टींचा विचार केला जातो. किंमत आणि वाहनाचे वय यावरुन चारचाकीचा कर १३ ते ९३ टक्केपर्यंत जाऊ शकतो. तर इलेक्ट्रिक वाहनांसाठी कर ४ टक्क्यांपर्यंत असू शकतो.

कर बुडवणाऱ्या सुपरकार्स विरोधात वाहतूक विभागाची कारवाई सुरुच राहील असे त्यांनी स्पष्ट केले आहे. फेब्रुवारीत विभागाने ३० सुपरकार्सवर कारवाई केली होती. यात फेरारी, पोर्शे, बीएमडब्ल्यु, ऑडी, अस्टन मार्टीन आणि रेंज रोव्हर यांचा समावेश होता. यात वाहतूक विभागाच्या ४० अधिकाऱ्यांचा समावेश होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशी दिवशी 5 ग्रहांचा महायोग, 'या' राशींना मिळणार बंपर लाभ

Paliem: कुळवाड्यांनी शेकडो वर्षांपूर्वी भूमातेची पूजा आरंभली! निसर्गसंपन्न 'पालये' गाव; भोम येथील महाकाय वटवृक्ष

Opinion: प्लेटो दाखवून देतो, ‘लोकशाही’ शहाणपणापेक्षा ‘लोकप्रिय’ मताला प्राधान्य देऊन, हुकूमशाहीचा मार्ग सुकर करते

Ashadhi Ekadashi: ..जातां पंढरीसी सुख वाटे जीवा। गोव्यातील लाखो वारकऱ्यांनी गाठले पंढरपूर

Sanguem Rathotsav: विठ्ठल, विठ्ठल! सांगेत भाविकांचा पूर, रथोत्सवानिमित्त होणार विठूनामाचा गजर

SCROLL FOR NEXT