
Landslide update Konkan, Khed: रत्नागिरी आणि साताऱ्याला जोडणाऱ्या रघुवीर घाटात दरड कोसळण्याची घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यामुळे गुरुवारी सकाळपासून घाटात मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. शालेय विद्यार्थी देखील घाटातच अडकून पडले. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने गुरुवारी ११ च्या सुमारास दरड हटवून मार्ग वाहतुकीसाठी खुला केला.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड आणि सातारा जिल्हा यांना जोडणाऱ्या रघुवीर घाटात बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास दरड कोसळली. दगड – मोती सोबत एक मोठा दगड देखील रस्त्यात येऊन पडला. त्यामुळे घाट पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद झाला. गुरुवारी सकाळपासून घटात वाहनांच्या रांगा पाहायला मिळाल्या. यामुळे शाळकरी मुले देखील बसमध्ये अडकून पडली.
सार्वजनिक बांधकाम खात्याने घडलेल्या घटनेची दखल घेत, घाटातील दरड हटविण्याचे काम सुरु केले. गुरुवारी अकराच्या सुमारास दरड हटविण्यात प्रशासनाला यश आले. यानंतर अखेर रघुवीर घाट वाहतुकीसाठी खुला झाला.
रघुवीर घाटात गेल्या चार दिवसांत दुसऱ्यांदा दरड कोसळण्याची घटना घडली. रत्नागिरी, सिंधुदुर्गात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे दरड प्रवण भागात दरड कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.