BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

BJP President Election: जे. पी. नड्डा यांचा अध्यक्ष म्हणून कार्यकाळ जानेवारी २०२३ मध्ये समाप्त झाला होता, त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना जून २०४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली.
BJP National President Election
D PURANDESWARI | NIRMALA SITHARAMAN And VANATHI SRINIVASANDainik Gomantak
Published on
Updated on

या बाबतमीत काय वाचाल?

१) भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिला नेत्याकडे सोपविण्याचा विचार करत आहे.

२) भाजपकडून राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी तीन महिला नेत्यांची नावे विचारात घेतली आहेत.

३) अध्यक्षपदासाठी आरएसएस कशाप्रकारे भूमिका बजावत आहे.

नवी दिल्ली: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक जवळपास एकवर्षापासून प्रलंबित आहे. नुकेतच महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची निवड झाल्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीची चर्चा सुरु झाली आहे.

केंद्रीय स्तरावर यासाठी हालचाली सुरु असून, यावेळी भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदी महिलेची निवड करण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे आरएसएसने याबाबत सूचना केल्याची माहिती समोर आली आहे.

जे. पी. नड्डा यांचा अध्यक्ष म्हणून कार्यकाळ जानेवारी २०२३ मध्ये समाप्त झाला होता, त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना जून २०४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर एक वर्षापासून अध्यक्षपदाची निवडणूक प्रलंबित आहे.

दरम्यान, लवकरच ही निवडणूक होण्याची शक्यता आहे. राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या चर्चांनुसार, भाजप यावेळी महिला नेत्याची अध्यक्षपदी निवड करण्याची शक्यता आहे. आरएसएसने देखील यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे.

BJP National President Election
Khed: रत्नागिरी साताऱ्याला जोडणाऱ्या रघुवीर घाटात दरड कोसळली; दहा तासांनी वाहतूक खुली, चार दिवसांत दुसरी घटना

राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी भाजपच्या तीन बड्या महिला नेत्यांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये अर्थमंत्री निर्मला सितारामण, डी. पुरनदेश्वरी आणि वनाथी श्रीनिवासन यांची नावे शर्यतीत आहेत.

निर्मला सितारामण

भाजपच्या अध्यक्षपदासाठी विद्यमान अर्थमंत्री निर्मला सितारामण यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. अलिकडेच सितारामण यांची विद्यमान अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि सचिव बी. एल. संतोष यांच्याशी पक्षाच्या मुख्यालयात चर्चा झाली. सितारामण यांचा राजकीय अनुभव विचारात घेता त्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत अव्वल स्थानी असल्याची चर्चा आहे.

सितारामण यांची अध्यक्षपदी निवड झाल्यास पक्षाच्या दक्षिणेतील विस्तारासाठी फायदा होणार आहे. अर्थमंत्री पदाचा कार्यभार संभाळणाऱ्या सितारामण यांनी संरक्षण मंत्री म्हणून देखील काम केले आहे.

डी. पुरनदेश्वरी

आंध्रप्रदेश भाजपच्या माजी अध्यक्ष डी. पुरनदेश्वरी यांचे देखील नाव अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहे. विविध भाषांवर असणारे प्रभुत्व तसेच पक्षातील दिर्घ अनुभव असलेल्या पुरनदेश्वरी यांचा अध्यक्षपदासाठी भाजप विचार करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी जगभर गेलेल्या नेत्यांच्या गटात देखील डी. पुरनदेश्वरी यांचा समावेश होता.

BJP National President Election
Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

वनथी श्रीनिवासन

वनथी कोईम्बतूर मतदारसंघाच्या भाजप आमदार आहेत. वनथी यांनी १९९३ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला, यानंतर त्यांनी सचिव, उपाध्यक्ष म्हणून पक्षासाठी काम केले. २०२० मध्ये त्यांची पक्षाने भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड केली. २०२२ मध्ये त्या भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या सदस्य झाल्या, तामिळनाडूमधून सदस्य झालेल्या त्या पहिल्याच महिला होत्या. भाजप वनथी यांचा देखील राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी विचार करत आहे.

आरएसएस

भाजपने महिला नेत्याला राष्ट्रीय अध्यक्ष करावे यासाठी राष्ट्रीय स्वयं सेवक संघाने देखील ग्रीन सिग्नल दिल्याचे माहिती देशपातळीवरील माध्यमांनी प्रसिद्ध केली आहे. गेल्या काळात पार पडलेल्या निवडणुकीत भाजपला मत दिलेल्यांमध्ये महिलांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. महाराष्ट्र, हरियाणा आणि दिल्लीत हा बदल पाहायला मिळाला आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न :

१) प्रश्न: भाजपचे सध्याचे राष्ट्रीय अध्यक्षपद कोणाकडे आहे?

उत्तर: भाजपचे सध्याचे राष्ट्रीय अध्यक्षपद जे. पी. नड्डा यांच्याकडे आहे.

२) प्रश्न: महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?

उत्तर: रवींद्र चव्हाण यांची महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे?

३) प्रश्न: भारतीय जनता पक्षाची स्थापना केव्हा झाली?

उत्तर: ०६ एप्रिल १९८० रोजी भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com