Social Media Dainik Gomantak
देश

'कच्चा बदाम' नंतर 'लिंबु सोडा'! व्हायरल व्हिडिओ पाहिलात का?

दैनिक गोमन्तक

जेव्हा "कच्चा बदाम" हे गाणे सोशल मीडियावर आले, तेव्हा ते झपाट्याने हिट झाले, आणि त्यामुळेच पश्चिम बंगालमधील शेंगदाणे विक्रेते भुबन बद्यकर हे रातोरात त्या गाण्यामुळे सेलिब्रिटी झाले. तसंच काहीसं घडल्याचं समोर आलं आणि त्यानंतर, पेरू विक्रेत्याने त्याच्या जवळील फळे विकण्यासाठी एक आकर्षक जिंगल तयार केली जी सध्या इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. (Lemon soda seller's jingle is going viral on the internet)

आता, लिंबू सोडा विक्रेत्याची शैली आणि जिंगल इंटरनेटला आनंद देत आहे असं म्हणायला हरकत नाही. तो वापरत असलेली जिंगल - "बाकी निंबु बाद विच पौंगा" (बाकी लिंबू नंतर वापरेन)” सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

त्या माणसाभोवती जमलेले लोक लिंबूपाणी विकण्याच्या त्याच्या अनोख्या पद्धतीचा आनंद लुटताना आपण व्हिडीओ मध्ये बघू शकता. लिंबूपाणी विक्रेते उन्हाळ्यात पेय पिण्याचे फायदे सांगताना त्यातील घटकांचेही वर्णन ते करतात.

हा व्हिडिओ वेगवेगळ्या सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या यूजर्सनी शेअर केला आणि आता तो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. इंस्टाग्रामवर 13_gouravsagar05 ने पोस्ट केले आहे तर तो 9.21 लाख वेळा पाहिला गेला आहे आणि संख्या झपाट्याने वाढत आहे.

वापरकर्त्यांनी काही प्रतीक्रिया देत म्हटले आहे की, “व्वा सर मला तुमचा आत्मविश्वास खूप आवडला,” एका इंस्टाग्राम वापरकर्त्याने म्हटले की, "हा 'काचा बदाम' गायकाचा मुलगा आहे," इथे आणखी एक गायक जोडला गेला आहे.

काही युजर्सनी मागिल काही महिन्यांपूर्वी याच व्यक्तीचा व्हिडिओ शेअर केला होता. बड्याकर यांच्या गाण्यानंतर अलिकडच्या काही आठवड्यांत अशा अनेक जिंगल्स उदयास आल्याने त्याला पुन्हा नेटिझन्स कडून आकर्षण मिळत आहे.

एका ग्राहकाने शेंगदाणे विकताना त्याचा व्हिडिओ शूट करून तो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर " कच्चा बदाम " हे गाणे व्हायरल झाले होते .

हे गाणे जगभर व्हायरल झाल्यानंतर, लोक विचारू लागले की गायकाला त्याच्या गाण्याच्या व्ह्यूजसाठी पैसे मिळतात का? त्यानंतर बड्याकर यांना त्यांच्या मूळ गाण्याचे प्रथम रिमिक्स करणाऱ्या संगीत लेबलकडून ₹ 3 लाख मोबदला मिळाल्याची माहिती देण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji News: मळ्यातील तळ्याचे सुशोभिकरण कधी? पणजीतील स्थानिकांचा सवाल

Panaji Smart City: पणजी मनपा इमारतीला 'ग्रीन सिग्नल' कधी? दोनदा पायाभरणी; मात्र कामाला सुरुवात नाही

Chimbel Flyover: Saint Francis Xavier अवशेष प्रदर्शनापूर्वी एक मार्ग होणार खुला ; चिंबल उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वाकडे

Indian Coast Guards: भारतीय तटरक्षक दलाचा जोरदार सराव! गोवा, महाराष्ट्र किनारपट्टीच्या सुरक्षाव्यवस्थेचे सर्वेक्षण

Hina Khan: तिसऱ्या स्टेजच्या कॅन्सरशी लढणाऱ्या हिनाला गोव्यात वृद्ध महिलेकडून मिळाली प्रेरणा; देवाकडे केली प्रार्थना Video

SCROLL FOR NEXT