‘नवे कृषी धोरण आणा, अन्यथा...’; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी मोदी सरकारला दिला अल्टिमेटम

के चंद्रशेखर राव (K Chandrashekhar Rao) यांनी शेतकरी आणि शेतीच्या प्रश्नावर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला (Modi Government) खुले आव्हान दिले आहे.
K Chandrashekhar Rao
K Chandrashekhar RaoDainik Gomantak
Published on
Updated on

तेलंगणाचे (Telangana) मुख्यमंत्री आणि तेलंगण राष्ट्र समितीचे (TRS) अध्यक्ष के चंद्रशेखर राव (K Chandrashekhar Rao) यांनी शेतकरी आणि शेतीच्या प्रश्नावर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला (Modi Government) खुले आव्हान दिले आहे. लवकरात लवकर नवीन कृषी धोरण आणा, नाहीतर तुम्हाला सत्तेतून पायउतार करु, असे राव यांनी म्हटले आहे. तांदूळ खरेदीच्या मुद्द्यावरुन नवी दिल्लीत पक्षाच्या नेत्यांसोबत आंदोलन करणाऱ्या केसीआर यांनी म्हटले की, 'पंतप्रधान माफीचे व्यापारी आहेत.'

ते पुढे म्हणाले, "तेलंगणाचे शेतकरी भीक मागत नाहीत तर आपला हक्क मागत आहेत. नवीन कृषी धोरण बनवा नाहीतर तुम्हाला सत्तेतून हटवू. शेतकऱ्यांना गंगेत ढकलण्याइतके आम्ही दुबळे नाही.’’ केंद्रावर हल्लाबोल करताना केसीआर म्हणाले की, ‘हे षड्यंत्र करणारे सरकार आहे. मोदी सरकारकडे पैसा नाही की शेतकऱ्यांबद्दल विचार करण्यासाठी मन नाही? शेतकऱ्यांसाठी दावा करणाऱ्या पंतप्रधान मोदींना लाज वाटली पाहिजे.’’

K Chandrashekhar Rao
काँग्रेस नेत्याने स्मृती इराणींना विमानातच घेरले

गेल्या काही महिन्यांपासून पीएम मोदींना विरोध करणारे केसीआर म्हणाले, “मोदींमध्ये हिंमत असेल तर त्यांनी मला अटक करावी.” ते पुढे म्हणाले, ‘जो कोणी त्यांच्या विरोधात बोलतो, त्यांच्याविरुद्ध सीबीआय आणि ईडीचा फेरा लावला जातो. दुसरीकडे, मात्र भाजपमधील राजकीय पुढारी हरिश्चंद्राचा अवतार आहेत.’

केसीआर पुढे म्हणाले, "हात जोडून मी पंतप्रधान आणि केंद्रीय अन्न मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांना सांगतो की कृपया आमचे अन्नधान्य खरेदी करा. मी तुम्हाला 24 तासांचा अल्टिमेटम देतो, त्यानंतर आम्ही आमचा निर्णय घेण्यास मोकळे आहोत."

K Chandrashekhar Rao
विमानातच महिलेने दिला बाळाला जन्म; दोघांच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी दिली माहिती

दरम्यान, केसीआर यांनी शेतकऱ्यांना एमएसपी देण्याची मागणी केली. त्यासाठी आम्ही मोदी सरकारच्या विरोधात आंदोलन करु, असेही ते म्हणाले. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यावर हल्ला करताना केसीआर म्हणाले की, ‘पियुष गोयल हा मूर्ख मंत्री आहे.’

केसीआर शेवटी म्हणाले की, ‘’पंतप्रधान आमचा अपमान करत आहेत. त्यांना विचारा भात पिकवणे गुन्हा आहे का? कवडीमोलामध्ये शेती कॉर्पोरेट घराण्यांच्या हातामध्ये सुपुर्द करुन शेतकऱ्यांना कंगाल करणे हाच मोदी सरकारचा मूळ हेतू आहे.’’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com