Angarki Sankashti Chaturthi Dainik Gomantak
देश

अंगारकी चतुर्थीचे जाणून घ्या महत्त्व

मंगळवारी चतुर्थी तिथीवर आल्यानंतर अंगारक चतुर्थीचा योगायोगच तयार होतो.

दैनिक गोमन्तक

मंगळवारी चतुर्थी तिथीवर आल्यानंतर अंगारक चतुर्थीचा (Angarki Sankashti Chaturthi) योगायोगच तयार होतो. तर हे खूप शुभ आणि फलदायी मानले जाते. भारतीय परंपरेनुसार चतुर्थी महिन्यात दोनदा येते. भगवान गणेशाचा जन्म चतुर्थी तिथीला झाला होता, म्हणून ही तिथी गणेशाला समर्पित केली जाते. अमावस्येनंतर येणार्‍या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी आणि पौर्णिमेनंतर येणार्‍या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी असंही म्हणतात. पण जर चतुर्थी तिथी मंगळवारी आली तर तिला अंगारकी चतुर्थी देखील म्हणतात. यावेळी अंगारकी चतुर्थी वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या तिसऱ्या तारखेला आहे म्हणजेच हा सण 19 एप्रिल 2022 रोजी साजरा केला जाणार तर अंगारकी चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असेही म्हणतात. (Learn the importance of Angarki Chaturthi)

अशा प्रकारे अंगारकी चतुर्थीला अंगारकी चतुर्थी नावाने गणपतीची विधिवत पूजा केली जाते आणि उपवास ठेवला जातो. अंगारकी चतुर्थीला उपवास केल्याने वर्षभर चतुर्थी तिथीचे फळ मिळते तर सर्व मनोकामना पूर्ण होतात, असा समज आहे. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणेशाचे स्वरूप चतुर्मुखी आणि चतुर्भुज असते असे देखील मानले जाते. गणेशाच्या या रूपाला संकटमोचन गणेश देखील म्हणतात. असे मानले जाते की अंगारक म्हणजेच मंगळदेवाने गणेशाचे तप केले होते, त्यामुळे गणपतीने प्रसन्न होऊन मंगळवारी चतुर्थीला तिथी येईल त्या दिवशी अंगारकी गणेश चतुर्थी म्हणून ओळखले जाणार असे वरदान दिले.

अंगारकी चतुर्थीचे महत्त्व

अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणेश पूजनासह हनुमानजींची पूजा केल्याने विशेष लाभ होतो, असा समज आहे. तसेच या दिवशी सिंदूर लावून तिलक लावल्याने मंगळ दोष देखील दूर होतो आणि कुंडलीत मंगळाची स्थिती शुभ राहत असते. असे मानले जाते की अंगारकी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेश सर्व संकटे, अडथळे दूर करतात आणि सुख, शांती, समृद्धीचा आशीर्वाद देतात. भगवान गणेश हा केवळ सर्व देवी-देवतांमध्ये सर्वोच्च मानला जात नाही तर तो बुद्धी, विवेक आणि शक्तीचा स्वामी मानला जातो. विघ्नहर्ता गणेशाचे अंगारकी चतुर्थी व्रत सर्व त्रास आणि दु:ख दूर करण्यासाठी लोकप्रिय आहे.

भगवान गणेशाचा मंत्र

गजाननम् भूत गणदी सेवितम्, कपित्थ जम्बू फल चारु भक्षणम् आहे.

उमासुतम शोक विनाशकरकम, नमामि विघ्नेश्वर पद पंकजम्।

अंगारकी चतुर्थीची उपासना पद्धत आणि उपवासाचे नियम

अंगारकी चतुर्थी व्रत करणार्‍यांनी ब्रह्म मुहूर्तावर स्नान, तप वगैरे आटोपल्यानंतर ‘ओम गं गणपतये नमः’ या मंत्राचा उच्चार करून व्रत करावे. तसेच लाल रंगाचे कपडे परिधान करा, यामुळे मंगळाची स्थिती मजबूत राहते. कोणी उपवास करत नसला तरी गणेशाची पूजा करायला हवी. व्रत करणाऱ्या व्यक्तीने पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून गणेशाची पूजा करायला हवी.

गणपतीच्या पूजेमध्ये दुर्वा, धूप-दीप, मोदक किंवा मोतीचूर लाडू यांसारख्या गणपतीच्या आवडत्या वस्तू अर्पण करायला हव्या. यानंतर गणेश चालीसा, गणेश गणेश स्तोत्र किंवा गणेश अथर्वशीर्षाचे पठण करा. गणेशाच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर करू नये हे प्रखरतेने लक्षात ठेवा. पूजेच्या दिवसभर ओम गं गणपतये नमः या मंत्राचा जप करा. यासोबतच उपवासाचे नियम पाळून तुम्ही फलाहार करू शकता. चंद्र उगवण्यापूर्वीच गणेशाची आराधना करा; गणपतीच्या मूर्तीवर किंवा चित्रावर धूप-दीप, फळे, फुले यांचा नैवेद्य अर्पण करावे. गणेशाला चंदनाची लस लावा आणि लाडूंचा भोग लावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! वार्षिक वेतनवाढ 3 टक्क्यावरून 5 टक्के होणार? पगारात नेमकी किती वाढ होईल? जाणून घ्या

Goa Illegal liquor Seizure: कोंड्याच्या पोत्यांचा आडोसा अन् दारूची तस्करी! पेरणे अबकारी अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे 3 लाख 78 हजारांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT