जम्मू पोलिसांची मोठी कारवाई, 54 राऊंड पिस्तुलांसह स्फोटकांचा मोठा साठा जप्त

मोदी सरकारचा हल्ला बोल, या फुटीरतावाद्यांना केले दहशतवादी घोषित
Jammu Police
Jammu PoliceDainik gomantak
Published on
Updated on

केंद्रात सत्तेत आल्यापासून मोदी सरकारचा (Modi Government) दहशतवादाबाबतचा दृष्टिकोन कायम आहे. आता सरकारने दहशतवादी (Terrorist) संघटनांनाच नव्हे तर त्यांच्या नेत्यांना दहशतवादी घोषित करून त्यांची दुकाने कायमची बंद करण्याची तयारी केली आहे.

दरम्यान जम्मू आणि काश्मीरमध्ये कुपवाडा पोलिसांनी (Kupwara Police) लष्करासह हजम मोहल्ला, ताड कर्नाह येथे शोध मोहिमेदरम्यान 10 पिस्तूल, 17 पिस्तुल मॅगझिन, 54 पिस्तुल राऊंड आणि 5 ग्रेनेडसह शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांचा मोठा साठा जप्त केला.असून काही अरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास काश्मीर पोलिस करत आहे.

Jammu Police
पुलवामात पुन्हा दहशतवादी हल्ला; एक जवान शहीद, एक जखमी

नेंगरू हा JeM चा सक्रिय सदस्य आहे

मोदी सरकारने आता पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed Terrorist) चा सक्रिय सदस्य आशिक अहमद नेंगरू (Ashiq Ahmed Nengroo) याला दहशतवादी घोषित केले आहे. सोमवारी जारी केलेल्या आदेशात, नेंगरूला बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा, 1967 अंतर्गत दहशतवादी घोषित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. दहशतवाद रोखण्यासाठी नेंगरूला आता दहशतवादी घोषित करण्यात आल्याचे गृह मंत्रालयाने सांगितले.

दहशतवादी घुसखोरी करत आहेत

गृह मंत्रालयाने जारी केलेल्या राजपत्रातील अधिसूचनेनुसार, आशिक अहमद नेंगरू हा जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना घुसवण्यात सहभागी होता. खोऱ्यात आल्यानंतर ते दहशतवादी सामान्य लोक आणि सुरक्षा दलांवर हल्ले करायचे.

Jammu Police
'हिंदू महिलांनी चार मुलांना जन्माला घालवं, दोन RSS तर दोन...'

अनेक मोठ्या हल्ल्यांमध्ये सामील आहे

नेंगरू काश्मीरमध्ये दहशतवादी सिंडिकेट चालवत आहे. तो सध्या पाकिस्तानच्या सूचनेनुसार जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवण्याच्या धोकादायक मोहिमेत गुंतला आहे. आशिक अहमद नेंगरू पुलवामा येथील हयान बाला राजपोरा येथील रहिवासी आहे. 2013 मध्ये पुलवामा येथे एका पोलीस कर्मचाऱ्याची हत्या, 2020 मध्ये एका नागरिकाची हत्या, दहशतवादी फंडिंग आणि दहशतवाद्यांना बेकायदेशीर शस्त्रास्त्रांचा पुरवठा अशा अनेक प्रकरणांमध्ये त्याचा सहभाग होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com